ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या वन-डे सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा आपली चमक दाखवली. सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर अंकुश ठेवताना, भारतीय गोलंदाजांनी धावसंख्या वाढली जाणार नाही याची काळजी घेतली. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथ आणि लाबुशेनचा अपवाद वगळता इतर फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाही. मात्र भारताकडून गोलंदाजांसोबतच क्षेत्ररक्षकांनीही चांगली कामगिरी केली. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर घेतलेला लाबुशेनचा झेलही चांगलाच व्हायरल होतो आहे.
अवश्य वाचा – Ind vs Aus : …म्हणून टीम इंडिया हाताला काळी पट्टी लावून मैदानात
सुरुवातीच्या फळीतले फलंदाज माघारी परतल्यानंतर स्मिथ आणि लाबुशेन जोडीने महत्वपूर्ण भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. लाबुशेनने यादरम्यान आपलं अर्धशतकही साजरं केलं. ३२ व्या षटकात रविंद्र जाडेजाच्या गोलंदजाजीवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात लाबुशेन विराट कोहलीच्या हाती झेल देऊन माघारी परतला. कोहलीनेही मैदानात आपली चपळाई दाखवताना उडी मारत झेल घेऊन भारताला हवी असलेली विकेट मिळवून दिली. पाहा हा भन्नाट व्हिडीओ…
लाबुशेन माघारी परतल्यानंतरही स्टिव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाची बाजू सांभाळली. भारतीय गोलंदाजांचा सामना करताना स्मिथने शतकही झळकावलं.
अवश्य वाचा – शून्यावर बाद झाल्यामुळे मिचेल स्टार्क झाला ट्रोल