भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळला जात आहे. मात्र मालिकेतील पुढील वेळापत्रकात बदल केला जाण्याची शक्यता आहे. खरे तर या मालिकेतील तिसरा सामना एचपीसीए अर्थात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर १ ते ५ मार्च या कालावधीत धर्मशाळा येथे खेळवला जाणार आहे. परंतु येथे नुकत्याच झालेल्या नूतनीकरणानंतर हे मैदान आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्यास योग्य मानले जात नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईएसपीएनक्रिकइन्फोमधील वृत्तानुसार, बोर्डाच्या तज्ञांच्या टीमने केलेल्या मैदानाच्या तपासणीच्या निकालांच्या आधारे बीसीसीआय पुढील काही दिवसांत अंतिम निर्णय घेईल. बीसीसीआयने बॅकअप ठिकाणाची निवड आधीच केली आहे, परंतु धर्मशाळा यजमान हक्क काढून घेतल्यानंतर त्याची घोषणा केली जाईल.

बॅकअपसाठी चार स्टेडियम निश्चित –

बॅकअप ठिकाणांबद्दल बोलायचे झाले तर, तिसर्‍या कसोटीसाठी विशाखापट्टणम, राजकोट, पुणे आणि इंदूर यांना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. बोर्डाच्या तज्ज्ञांच्या तपासणीदरम्यान धर्मशाळा मैदान अपयशी ठरल्यास तिसरी कसोटी या मैदानांवर हलवली जाऊ शकते.

धर्मशाळा मैदानावरील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना –

धर्मशाळा येथील या मैदानावर शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-२० फॉरमॅटमध्ये गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये खेळला गेला होता. तेव्हापासून या मैदानावर कोणतेही क्रिकेट खेळले गेले नाही. कारण एचपीसीएने आउटफिल्ड रिले आणि नवीन ड्रेनेज सिस्टम बसवण्याचा निर्णय घेतला. असे समजले जाते की आउटफिल्ड अद्याप तयार नाही, आणि गवताचे आच्छादन अद्याप पकडलेले नाही.

हेही वाचा – Mohammad Shami: ‘तेव्हा शमीने मला मेसेज केला होता…’, पाकिस्तानच्या दिग्गजाने केला धक्कादायक खुलासा

दरम्यान, एचपीसीएला या खेळांचे आयोजन करण्याचा आत्मविश्वास आहे. बरेच काम पूर्ण व्हायचे बाकी असताना, अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की येत्या आठवड्यात स्टेडियम सामन्यांसाठी तयार होईल. आतापर्यंत या मैदानावर फक्त एक कसोटी झाली आहे. एचपीसीएच्या सूत्राने सांगितले की, ”बीसीसीआयच्या तपासणीनंतर एचपीसीए निर्णय घेईल. आम्ही योग्य ड्रेनेजसह संपूर्ण पृष्ठभाग पुन्हा घातला आहे आणि जमिनीवर शिंपडले आहे. अजून काही कामं व्हायची आहेत आणि तीन आठवडे बाकी आहेत, त्यामुळे काम पूर्ण होईल असं वाटतं आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 3rd test bcci keeps options open as concerns mount over relaid outfield in dharamshala vbm
Show comments