भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या कोळकर स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच तिसरा सामना देखील तिसऱ्याच दिवशी निकाली निघाला. पण यावेळी भारतीय संघ पराभूत झाला असून ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने हा सामना ९ विकेट्सने जिंकला. पराभवानंतर भारतीय संघ या कसोटी मालिकेत सध्या २-१ अशा आघाडीवर आहे. मात्र त्यात ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात चेंडू बदल्यानंतर फलंदाजी करणे सहज सोपे झाले. यावर सोशल मीडियात अनेक कमेंट्स येत आहेत.

तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड घेतली होती. नॅथन लाएनच्या ८ विकेट्सच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने यजमान भारताचा दुसरा डाव १६३ धावांवर गुंडाळला आणि त्यांना विजयासाठी ७६ धावा करायच्या आहेत. पण, हा धावा करणं एवढं सोपं नक्की नाही, याची कल्पनाही त्यांना आहेच. आर अश्विनने नव्या चेंडूसह दुसऱ्याच चेंडूवर उस्मान ख्वाजाची विकेट घेऊन त्याची प्रचिती दिली. स्टेडियममधील प्रेक्षक भारतीय गोलंदाजांचा मनोबल वाढण्यासाठी करत असलेला जल्लोष पाहून ऑसी फलंदाज बॅकफूटवर गेले. यावर उतारा म्हणून मार्नस लाबुशेनने माईंड गेम सुरू केला आणि त्याला समजावण्यासाठी रोहित शर्मा व अंपायर यावे लागले. त्यानंतर चेंडू देखील बदलण्यात आला कारण तो चेंडूचा आकार टेस्ट करण्याच्या रिंग मध्ये तो फिट बसत नव्हता. चेंडू बदल्याने फलंदाजी करण्यास सोपे झाले.

Loksatta anvyarth Gautam Gambhir India lose in Test series
अन्वयार्थ: खरेच ‘गंभीर’ आहोत?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Border-Gavaskar Trophy Test series Team India defeat australia jasprit bumrah virat kohli rohit sharma
विश्लेषण : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या पराभवास कारणीभूत ठरले हे सहा घटक…
IND v AUS Australia wins BGT 2025 after 10 years against India
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनी भारताला नमवत जिंकली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, WTC फायनलमध्ये मारली धडक
IND vs AUS Rohit Sharma Reaction
IND vs AUS : ‘क्रिकेट खेळा, फालतूच्या गोष्टी…’, बुमराह-कॉन्स्टास वादावर रोहित शर्माची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आमचे खेळाडू…’
IND vs AUS 5th Test Irfan Pathan reaction on Rohit Sharma after he opt to drop from Sydney match
IND vs AUS : ‘…हे स्वतः फलंदाजाला कळतं’, रोहित शर्माबद्दल इरफान पठाणचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘प्रत्येक खेळाडू…’
IND vs AUS Rohit Sharma has decided to rest himself for the Sydney Test and has made two changes to the Indian team
Rohit Sharma : रोहित शर्माचा मोठा निर्णय! शेवटच्या कसोटीत स्वत: घेतली विश्रांती, ‘या’ खेळाडूची कर्णधारपदी लागली वर्णी
IND vs AUS 5th Test Predicted Playing 11 Full Squad Players List Match Timing Live Telecast
IND vs AUS: रोहित शर्माच्या विश्रांतीच्या निर्णयानंतर प्लेइंग इलेव्हन कशी असणार? सिडनी कसोटी किती वाजता सुरू होणार?

चेंडू बदल्यानंतर अचानक फलंदाजी करणे सोपे झाले

भारतीय संघाने ठेवलेल्या ७६ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. पहिल्या चेंडूपासूनच वळण अधिक होते त्यामुळे फलंदाजी करणे एवढे सोपे नव्हते आणि त्यात उस्मान ख्वाजाची विकेट पडली. त्यानंतर देखील लाबुशेन आणि हेड यादोघांना फटके मारणे अवघड जात होते. मग अचानक १०व्या षटकानंतर कांगारूंनी रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली आणि चेंडूवर आक्षेप घेतला. त्यानंतर अंपायरने चेंडूचा आकार टेस्ट करण्याची रिंग आणली आणि त्यात ती फिट झाली नाही असे ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे म्हणणे होते. त्यावर तोडगा म्हणून नवीन चेंडू घेण्यात आला मात्र ही गोष्ट रोहित शर्मा आणि अश्विनला अजिबात पटली नाही, यावर त्यांनी सपशेल नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: IND vs AUS 3rd Test: हिटमॅनची डिमांड अन् पुजाराचा खणखणीत षटकार, ड्रेसिंग रूममधून अशा रिअ‍ॅक्शन आल्या की…; Video व्हायरल

चेंडू बदलण्याआधी १० षटकात फक्त २७ धावा झाल्या होत्या आणि एक विकेट देखील पडली होती. पण चेंडू बदलताच फलंदाजी करण्यास सोपे झाले आणि आक्रमक फटके मारत लाबुशेन-हेड यांनी १३ षटकातच ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. यावर आता सोशल मीडियात चाहत्यांच्या वेगवगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

Story img Loader