IND vs AUS 3rd Test Highlights in Marathi: गाबा कसोटीत पाऊस आणि खराब हवामानामुळे कसोटी सामन्याच्या निकाल जाहीर करण्यात आला आहे. गाबा कसोटी सामना अनिर्णित राहिल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गाबा कसोटी अनिर्णित राहिल्याने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ १-१ बरोबरीत आहेत. भारतीय संघाकडून केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी पहिल्या डावात शर्थीचे प्रयत्न करत सामन्यात संघाला कायम राहण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना यश आल्याने हा सामना अनिर्णित राहण्यात भारताला यश आले. ऑस्ट्रेलियामधील पुढील कसोटी सामना मेलबर्नमध्ये होणार आहे, जो बॉक्सिंग डे कसोटी सामना असेल.

संपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा दबदबा होता मात्र चौथ्या आणि शेवटच्या दिवशी टीम इंडियाने अप्रतिम खेळ दाखवला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला फक्त २७५ धावांचं लक्ष्य दिलं होतं जे टीम इंडियाला गाठता आलं असतं. पण संपूर्ण दिवसात ब्रिस्बेनमध्ये पावसाची जोरदार हजेरी असल्याचे हवामान विभागाने आधीच सांगितले होते. टीम इंडियाने याआधीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध याच मैदानावर ३२८ धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम केला होता.

जसप्रीत बुमराहने गाबा कसोटीत भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली, त्याने पहिल्या डावात ६ आणि दुसऱ्या डावात ३ विकेट्स घेतल्या. या सामन्यात त्याच्या नावावर ९ विकेट्स होत्या. तर भारताकडून केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांची खेळीदेखील निर्णयाक ठरली. राहुलचे शतक १६ धावांनी हुकलं. पण भारतासाठी आतापर्यंत या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू राहुल आहे. तर जडेजाने या सामन्यात ७७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने पहिल्या डावात १५२ धावांची खेळी केली, ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. हेडशिवाय स्टीव्ह स्मिथने पहिल्या डावात १०१ धावांची खेळी केली.

सध्याच्या घडीला ५ सामन्यांची कसोटी मालिकेत दोन्ही संघ सध्या बरोबरीत आहे. भारताचा पुढील चौथा सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. तर पाचवा सामना सिडनीमध्ये नवीन वर्षात खेळवला जाईलय

Story img Loader