IND vs AUS 3rd Test Time: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्या सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना ऐतिहासिक गाबाच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तिसरा सामना १४ डिसेंबर शनिवारपासून सुरू होईल. गाबा म्हटलं की सर्वांनाच या मैदानावरील भारताचा ऐतिहासिक कसोटी विजय आणि ऋषभ पंतची ती निर्णयाक खेळी आठवते. आता पुन्हा एकदा तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार या मैदानावर पाहायला मिळणार आहे. पण या मैदानावरील सामना पाहण्यासाठी चाहत्यांना पहाटे लवकर उठावं लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचली तेव्हा या दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ७.५० वाजता सुरू झाला. पहिल्या दिवशी नाणेफेक अर्धा तास आधी झाली. उर्वरित दिवस, सामना ७:५० वाजता सुरू झाला. तीन दिवस झालेल्या या पहिल्या पर्थ कसोटीत भारताने ऐतिहासिक विजय नोंदवला. तर दुसरा सामना म्हणजेच गुलाबी चेंडूचा सामना सकाळी ९.३० वाजता सुरू झाला. दुसऱ्या कसोटीचा निकालाही ३ दिवसात लागला आणि यात भारताला पराभव पत्करावा लागला.

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?

भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांना पहाटे उठावं लागणार आहे. गाबा येथे होणारा तिसरा सामना पहाटे ५.५० वाजता सुरू होईल. पहिल्या दिवशी नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजे सकाळी ५.२० वाजता होईल. बाकीचे दिवस सामना थेट ५.५० वाजता सुरू होईल. तर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दिवसाचा खेळ संपण्याची शक्यता आहे. या कसोटी सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर पाहता येणार आहे. तर मोबाईलवर डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.

हेही वाचा – IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?

भारत वि ऑस्ट्रेलिया कसोटीतील चौथा आणि पाचवा सामना पहाटे सकाळी ५ वाजता सुरू होईल. म्हणजेच या सामन्यांमध्ये नाणेफेक सकाळी ४.३० वाजता होणार आहे. म्हणजे इतर दिवशीही पहाटे ५ वाजताच दिवसाचा खेळ सुरू होईल. भारताचा चौथा कसोटी सामना मेलबर्न तर पाचवा सामना सिडनीमध्ये खेळवला जाणार आहे.

हेही वाचा – ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO

सध्याच्या घडील पाच सामन्यांची कसोटी मालिका बरोबरीत आहे. भारताने पहिला सामना जिंकला आहे तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने आपल्या नावे केला आहे त्यामुळे १-१ अशा बरोबरीत असलेल्या या लढतीत कोणता संघ बाजी मारणार आणि आघाडी मिळवणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. दोन्ही संघांसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने सामना जिंकणं महत्त्वाचं असणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे, त्यामुळे सामना रद्द होणार की खेळवला जाणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 3rd test match timing date venue what time does the gabba test start bdg