India vs Australia 3rd Test: आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. टीम इंडियाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत आधीच २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. ही कसोटी जिंकून भारतीय संघाला मालिका जिंकायची आहे. तसेच, हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताचा पहिला डाव १०९ धावांवर संपला. आज सामन्याच्या सुरुवातीपासूनच ऑसी गोलंदाजांनी धुमाकूळ घातला आहे. विशेषत: भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंना खेळवण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंनी नऊ विकेट्स घेतल्या, तर शेवटची विकेट सिराज (०) धावबाद झाला.

डावाच्या पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कच्या चेंडूवर रोहित शर्माला दोन जीवदान मिळाले. त्याचा फायदा त्याला घेता आला नाही आणि पहिली विकेट म्हणून तो बाद झाला. रोहितला १२ धावा करता आल्या. यानंतर विकेट्सची लाईन लागली एकापाठोपाठ एक विकेट्स धडाधड पडत गेल्या. केएल राहुलच्या जागी खेळणारा शुबमन गिल झेलबाद झाला. त्याला १८ चेंडूत २१ धावा करता आल्या. यानंतर चेतेश्वर पुजारा (१) धावेवर बाद झाला, तर रवींद्र जडेजाने (४) धावा केल्या. श्रेयस अय्यरला खातेही उघडता आले नाही, तर विराट कोहलीला ५२ चेंडूत २२ धावा करता आल्या. श्रीकर भरत ३० चेंडूत १७ धावा करून बाद झाला. उपाहारापर्यंत भारताने सात गडी गमावून ८४ धावा केल्या होत्या.

उपाहारानंतर कुहनेमनने रविचंद्रन अश्विन (२) आणि उमेश यादव यांना बाद केले. उमेशने १३ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने (१७) धावांची खेळी केली. सिराज धावबाद झाला, तर अक्षर (१२) धावांवर नाबाद राहिला. डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू कुह्नेमनने पदार्पणाच्याच डावात पाच विकेट्स घेतल्या, तर लियॉनला तीन विकेट मिळाल्या. टॉड मर्फीला एक विकेट मिळाली. कुहनेमनने रोहित, शुबमन, श्रेयस, अश्विन आणि उमेश यांना बाद केले. त्याचवेळी लिओनने पुजारा, जडेजा आणि भरत यांना तंबूत पाठवले. कोहलीला टॉड मर्फीने बाद केले.

हेही वाचा: Border-Gavaskar Trophy: “केएल राहुलचा फलंदाजी दृष्टीकोन भारतासाठी धोकादायक…” टीम इंडियाच्या माजी खेळाडूची सडकून टीका

तत्पूर्वी, उपाहारापर्यंत भारताने सात गडी गमावून ८४ धावा केल्या होत्या. आज सामन्याच्या सुरुवातीपासूनच ऑसी गोलंदाजांनी धुमाकूळ घातला आहे. विशेषत: भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंविरुद्ध खेळण्यात अपयश आले. डावाच्या पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कच्या चेंडूवर रोहित शर्माला दोन जीवदान मिळाले. त्याचा फायदा त्याला घेता आला नाही आणि पहिली विकेट म्हणून तो बाद झाला. आज टीम इंडियाच्या फलंदाजांची पळताभुई थोडी केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 3rd test mathew kuhnemans 5 wicket haul the indian batsmen surrendered to the spin of the kangaroos the first innings ended on 109 runs avw