26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाने आपल्या अंतिम 11 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. पहिल्या दोन कसोटी सामन्यात अपयशी ठरलेल्या मुरली विजय आणि लोकेश राहुल यांना वगळण्यात आले आहे. त्याऐवजी भारतीय संघात सलामीसाठी युवा मयांक अग्रवालला अंतिम संघात स्थान देण्यात आलेलं आहे. मयांक अग्रवालसोबत सलामीला कोण येणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. मयांक अग्रवाल- हनुमा विहारी आणि मयांक अग्रवाल-रोहित शर्मा असे भारतापुढे दोन पर्याय आहेत. मयांकसोबत सलामीला हनुमा विहारीला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र संघात रोहित शर्माचा समावेश असल्याने तोही सलामीला येऊ शकतो.
पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माला संघात स्थान मिळाले होते. दुसऱ्या कसोटीला दुखापतीमुळे तो मुकला होता. पण तिसऱ्या कसोटीत रोहित शर्माला संधी मिळाली आहे. मात्र त्याला मेलबर्नच्या कसोटीमध्ये सलामीला येण्याची संधी आहे. या मैदानावर जरी रोहितला कसोटीमध्ये खेळण्याचा अनुभव नसला तरी त्याने येथे दहा मर्यादित षटकांच्या सामन्यात ५८ च्या सरासरीने ४०९ धावा केल्या आहेत. या मैदानावर रोहितने सहा एकदिवसीय आणि चार ट्वेंटी२० सामने खेळले आहेत. यामधील चार एकदिवसीय आणि दोन ट्वेंटी२० सामन्यात सलामीला येताना ६८.२० च्या सरासरीने ३१४ धावा केल्या आहेत. यावेळी त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन शतकेही केली आहेत. हनुमा विहारीच्या तुलनेत रोहित तुल्यबळ वाटत आहे. पण हनुमा विहारीने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सलामीसाठी संघव्यवस्थापक त्याचाही विचार करत असतील. सोशल मीडियावर चाहत्यांनी रोहित शर्माला सलामीला पाठवावी अशी विनंती विराट कोहलीला केली आहे. तसेच खूप दिवसानंतर विराट कोहलीने संतुलित संघाची निवड केल्याची पावती दिली आहे.
First time @imVkohli selected a best team after having lot of criticism.. Now it is the best time to make Rohit Sharma as opener n back him.. Great move…. Thanks virat… True cricket fan
— Rushikesh Patil (@ImRushi45) December 25, 2018
@imVkohli sir,make @ImRo45 Sir as the opener for the 3rd Test against d Aussies alongside @mayankcricket,we’d love see Hitman opening d innings,pretty sure as an opener he’ll be successful in d tests also as he has become in d ODIs #BleedBlue #TeamIndia @BCCI #AUSvIND #INDvAUS
— kushal chakraborty (@kushalc42148146) December 25, 2018
Opening Rohit Sharma and Mayank Agarwal
— Afzal Musa (@AfzalMusa1) December 24, 2018
#chodnamat #SPN #BCCI #AUSvIND
Batting Order should be
Rohit Sharma(opener)
Mayank Agarwal (opener)
Pujara
Virat
Rahane
Vihari
Pant
Jadeja
Shami
Ishant
Bumrah— Prashant (@Prashan49037119) December 25, 2018
India to field two new openers for the Boxing Day Test…will Vihari open with Mayank or will we see Rohit in a brand new avatar—A Test Opener? While Rahul is still a part of white-ball cricket, this means uncertain future for Vijay. #AusvInd #BoxingDayTest
— Aakash Chopra (@cricketaakash) December 25, 2018
तसेच, पृथ्वी शॉ दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी मंयक अग्रवालला संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे भारताकडे सलामीसाठी मयांक बरोबर रोहित-विहारी असे दोन पर्याय आहेत. कामगिरी आणि अनुभवाच्या जोरावर रोहित शर्मा सरस आहे. मात्र, अंतिम निर्णय संघ व्यवस्थापकाचा असणार आहे. सलामीला मयांकबरोबर कोण येणार हे अपल्याला उद्याच समजेल. कोहली फलंदाज म्हणून जबरदस्त आहे, पण एक कर्णधार म्हणून वादात राहिला आहे. त्याला आक्रमकतेने फायदा होत असेल, तर नक्कीच हे चांगले आहे, पण एक कर्णधार म्हणून त्याला संपूर्ण संघाचा विचार करायचा आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी असा आहे संघ –
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह