India vs Australia 3rd Test Playing 11: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बुधवारी (१ मार्च) रोजी इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना सुरू झाला असून भारतीय संघात काही महत्वाचे बदल पाहायाला मिळाला. भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. अशात तिसरा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ यावर्षीची ही बॉर्डर गावसकर ट्रॉफीही नावावर करू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉर्डर-गावसकर ही मालिका जिंकून भारतीय संघाला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावता येणार आहे आणि तीनही फॉरमॅटमध्ये नंबर वन असलेला तो आशियातील पहिला संघ ठरेन. ऑस्ट्रेलिया मालिकेत मुसंडी मारण्याच्या इराद्याने खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र त्याआधी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ऐवजी ‘विदर्भ एक्स्प्रेस’ अशी ओळख असणाऱ्या उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यामुळे तो या कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन करून श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न करेन.

१४ वर्षात फक्त एकच कसोटी जिंकली

ऑस्ट्रेलियाच्या मागील चार भारत दौऱ्यांवर नजर टाकली तर त्यांची कामगिरी खूपच लाजिरवाणी होती. गेल्या १४ वर्षात ऑस्ट्रेलियाने भारत दौऱ्यावर १४ कसोटी सामने खेळले. ज्यामध्ये कांगारू संघ फक्त एकच सामना जिंकू शकला. २०१६-१७ मध्ये त्याने भारत दौऱ्यावर पुणे कसोटी जिंकली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताचा ३३३ धावांनी पराभव केला. २००८-०९ ते २०१६-१७ पर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय भूमीवर सलग चार कसोटी मालिका गमावल्या आहेत. सध्याच्या मालिकेतही भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे.

हेही वाचा: IND vs AUS 3rd Test: भारताने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, केएल राहुलला डच्चू! शुबमन गिलला संधी

भारताकडून सलामीला कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी सुरुवात केली. मिचेल स्टार्कच्या पहिल्याच षटकात रोहित शर्माला दोन जीवदान मिळाले. पहिल्याच चेंडूवर रोहितच्या बॅटचा किनार लागला होता. संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाने अपील केले, परंतु मैदानावरील पंचांनी ते नाकारले. यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ रिव्ह्यूसाठी गेला नाही. नंतर टीव्ही स्क्रीनवरील रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू त्याच्या बॅटला लागला होता. मात्र त्यानंतर रोहितला त्याचा फायदा उठवता आला नाही. तो मॅथ्यू कुहनमनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात केवळ १२ धावा करून यष्टिचीत झाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 3rd test two changes made in the indian team umesh yadav replaced mohammad shami in the team avw