India vs Australia 3rd Test Updates:भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने इंदूरमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारतीय फिरकीपटूंच्या रेषा आणि लांबीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आपली पकड घट्ट केली आहे. कांगारूंनी प्रथम टीम इंडियाला १०९ धावांत गुंडाळले आणि नंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत ४ गडी गमावून १५६ धावा केल्या.
पाहुणा संघ पहिल्या दिवसांचा खेळ संपला, तेव्हा भारतापेक्षा ४७ धावांनी पुढे आहे. सामन्यानंतर भज्जीने रवींद्र जडेजा, आर अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या लांबीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, जर भारतीय फिरकीपटूंनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली असती, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी ४ ऐवजी ७ विकेट गमावल्या असत्या.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हरभजन सिंग म्हणाला, ‘सुरुवातीला फिरकीपटूंना त्यांची लेंथ माहीत नव्हती. ते भरपूर फुल्ल लेंथवर गोलंदाजी केली. त्यामुळे फलंदाजी करणे सोपे होते. कारण चेंडू तितकासा फिरत नाही. जेव्हा चेंडू बॅट किंवा पॅडच्या खूप जवळ असतो, तेव्हा असे होत नाही. यातून बाऊन्स किंवा फिरकीची शक्यता नाही.’
भज्जी पुढे म्हणाला, ‘एक स्पिनर म्हणून, तुम्ही तो स्वीप खेळेल असा अंदाज बांधून नये आणि त्यामुळे तुम्ही पूर्ण गोलंदाजी केली पाहिजे. जोपर्यंत ते तसे करत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला गुड लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. तुम्ही ऑस्ट्रेलियात खेळत असाल किंवा भारतात, गुड-लेन्थ स्पॉट नेहमीच गुड-लेन्थ स्पॉट असतो. ख्वाजाही याच कारणामुळे सेट झाला होता.’ या दरम्यान भज्जीने सांगितले की, जडेजाने चहापानानंतर त्याची लेंथ सुधारली होती, त्यामुळे त्याला तीन विकेट्सही मिळाल्या.
हेही वाचा – तिहेरी उडीपटू ऐश्वर्यावर चार वर्षांची बंदी
हरभजन पुढे म्हणाला, ‘टी-टाइमनंतर जडेजाने आपली लेंथ मागे ठेवताच त्याची गोलंदाजीची शैली पूर्णपणे बदलली. नंतर त्याला तीन विकेट्स मिळाल्याचे कारण म्हणजे त्याने आपली लेंथ मागे ठेवली. जेव्हा गती नसते, तेव्हा आपल्याला फुल्ल लेंथची गोलंदाजी करावी लागते. या विकेटमध्ये गती आहे. चांगली लांबी असलेल्या या खेळपट्टीवर जर तुम्ही योग्य लाइन आणि लेंथवर गोलंदाजी केली असती, जिथे भारतीय फिरकीपटूंनी कमी गोलंदाजी केली होती, तर त्यांना आज मिळालेल्या ४ ऐवजी ७ विकेट मिळाल्या असत्या.’
हेही वाचा – फ्रान्सचे माजी फुटबॉलपटू जस्ट फॉन्टेन यांचे निधन
सामन्याबद्दल बोलायचे तर ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या पहिल्या डावात ६९ षटकानंतर ४ बादज १८० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ७१ धावांची आघाडी घेतली आहे. कॅमेरून ग्रीन आणि पीटर हँड्सकॉम्ब प्रत्येकी १८ धावांवर खेळत आहेत.