Anushka and Athiya reaction after Rohit and Virat wickets : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतीस चौथा सामना मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करत भारतीय संघाची दाणदाण उडाली आहे. भारतीय संघाने ३३ धावांवर ३ विकेट्स गमावल्या आहे. ज्यामध्ये रोहित-विराटच्या विकेट्सचा समावेश आहे. हे दोन दिग्गज खेळाडू बाद झाल्यानंतर अनुष्का-अथियाची रिॲक्शन व्हायरल होत आहे.
अनुष्का आणि अथिया रिॲक्शन व्हायरल –
कर्णधार रोहित शर्मा सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्याची बॅट पूर्णपणे शांत आहे. हिटमॅन प्रत्येक धावेसाठी संघर्ष करत आहे. पण पाचव्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रोहित शर्माने दमदार सुरुवात केली. त्याने कोणतेही खराब शॉट खेळले नाहीत आणि खेळपट्टीवर तो खूपच आरामदायक दिसत होता. पण डावात प्रथमच क्रॉस शॉट खेळायला गेलेला रोहित शर्मा स्कॉट बोलँडच्या षटकात स्लिपमध्ये मिचेल मार्शच्या हाती झेलबाद झाला. तो ४० चेंडूत केवळ ९ धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीची रिॲक्शन समोर आली आहे.
रोहित-विराट स्वस्तात बाद –
या सामन्यात केएल राहुलनंतर विराट कोहलीही स्वस्तात बाद झाला. विराट कोहली ५ धावा करून मिचेल स्टार्कच्या चेंडूवर उस्मान ख्वाजाच्या हाती झेलबाद झाला. पुन्हा एकदा कोहलीला ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही, त्यामुळे त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले आणि तो स्लिपमध्ये झेलबाद झाला. उपाहारापूर्वी भारताला तिसरा धक्का कोहलीच्या रूपाने बसला. यानंतर त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टी निराश झाल्याचा फोटो व्हायरल होत आहे.
पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राचा खेळ सुरूच आहे. भारताने तीन गडी गमावून ३३ धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी अजून ३०७ धावांची गरज आहे. अजून ६५ षटके बाकी आहेत. ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल क्रीजवर आहेत. रोहित नऊ धावा आणि कोहली पाच धावा करून बाद झाला. केएल राहुल खातेही उघडू शकला नाही.