IND vs AUS 4th Test Australia sets India a target of 340 runs : मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव पाचव्या दिवशी २३४ धावांवर आटोपला. भारतासमोर ३४० धावांचे लक्ष्य आहे. पहिल्या डावाच्या आधारे कांगारूंकडे १०५ धावांची आघाडी होती, म्हणजेच एकूण आघाडी ३३९ धावांची होती. पाचव्या दिवशी बोलंड आणि लायन फलंदाजीला आले होते आणि त्यांना १८ मिनिटे क्रीजवर घालवता आली. बुमराहने नॅथन लायनला क्लीन बोल्ड करत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव संपुष्टात आणला आणि त्याचबरोबर आपल्या विकेट्सचे पंचक पूर्ण केले.

भारताला ३४० धावांचे लक्ष्य –

नॅथन लायनला ४१ धावा करता आल्या. लायन आणि बोलंड यांच्यात दहाव्या विकेट्ससाठी ६१ धावांची भागीदारी झाली. त्याने कसोटीत १३व्यांदा एका डावात पाच विकेट्स घेतल्या. बोलंड १५ धावांवर नाबाद राहिला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव ३६९ धावांवर आटोपला होता.

Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम
IND vs AUS ICC BCCI and Indian Cricket Team in One Word Australian Cricket Answer Watch Video
VIDEO: ICC पेक्षा BCCI वरचढ? ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दिली भन्नाट उत्तरं, हेड-स्मिथच्या उत्तराने वेधलं लक्ष
IND vs AUS Australia squad announced for 3rd 4th test Sam Konstas and Jhye Richardson Added in Team
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या संघात मेलबर्न-सिडनी कसोटीसाठी दोन मोठे बदल, १९ वर्षीय खेळाडूला दिली संधी
Travis Head Injury Update Suffers Groin Injury in Gabba Test
IND vs AUS: ट्रॅव्हिस हेड मेलबर्न कसोटीत खेळणार नाही? गाबा कसोटीत झाली होती दुखापत, स्वत: दिले अपडेट
IND vs AUS 3rd Test Match Drawn in Gabba
India vs Australia 3rd Test Drawn: गाबा कसोटीत पावसाचाच खेळ, कसोटी अनिर्णित; मालिका बरोबरीतच
IND vs AUS Australia Declared Innings on 89 Gives 275 Runs Target to India in 54 Overs in Gabba Test
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा माईंड गेम, झटपट धावा करत भारताला विजयासाठी दिलं इतक्या धावांचं लक्ष्य

भारताला इतिहास लिहिण्याची संधी –

या मालिकेत भारताला २-१ अशी आघाडी घ्यायची असेल, तर आज उरलेल्या ९२ षटकांत ३४० धावा कराव्या लागतील. मेलबर्नमध्ये आतापर्यंत ३०० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्यात आला आहे. आता भारतालाही मेलबर्नमध्ये इतिहास लिहिण्याची संधी आहे त्यासाठी या मैदानावर आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. कारण याआधी मेलबर्न कसोटीत ३३२ धावांचा सर्वात यशस्वी पाठलाग केला होता, जो इंग्लंडने १९२८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला होता. या सामन्यात तिन्ही निकाल लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – IND vs AUS : ‘विकेटची नितांत गरज होती, पण…’, जैस्वालकडून झेल सुटल्यानंतर संतापलेल्या रोहितवर ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूची टीका

गाबासारखा इतिहास पुन्हा घडवण्याची संधी –

२०२०-२११ मध्ये जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आला होता, तेव्हा टीम इंडियाला ब्रिस्बेन कसोटीत ३२८ धावांचे लक्ष्य मिळाले होते. आता २०२४ च्या मेलबर्न कसोटीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या सामन्यात शुभमन गिल खेळत होता, त्याने पहिल्या डावात ९१ धावा केल्या होत्या पण मेलबर्न कसोटीसाठी गिलला वगळण्यात आले. पण त्या सामन्याचा सर्वात मोठा हिरो होता ऋषभ पंत, ज्याची ८९ धावांची खेळी चाहत्यांच्या मनात अजूनही ताजी असेल.

Story img Loader