IND vs AUS 4th Test Jasprit Bumrah 5 Wicket Haul : जसप्रीत बुमराहने एमसीजी कसोची पुन्हा एकदा विकेट्सचे पंचक घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला ब्रेक लावला. मेलबर्न कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जसप्रीत बुमराहने नॅथन लायनला क्लीन बोल्ड करत १३व्यांदा कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्याचबरोबर दिग्गजांच्या यादीत स्थान पटकावले. लायनच्या विकेटमुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३४ धावांवर आटोपला आणि भारताला विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य मिळाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पहिल्या डावानंतर कांगारूंकडे १०५ धावांची आघाडी होती. यजमानांनी पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडिया ३६९ धावांवर गारद झाली होती. जसप्रीत बुमराहची कसोटी कारकिर्दीत पाच विकेट्स घेण्याची १३वी वेळ आहे. परदेशात एका डावात ५ विकेट्स घेणारा जसप्रीत बुमराह ११वा खेळाडू आहे. तो आशियाई खेळाडू म्हणून परदेशात सर्वाधिक ५ विकेट्स घेणारा संयुक्तपणे तिसरा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत, त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानची बरोबरी केली आहे, या यादीत लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जसप्रीत बुमराहची सरासरी जी वसीम अक्रम आणि मुथय्या मुरलीधरनसारख्या महान खेळाडूंपेक्षाही कमी आहे.

परदेशात आशियाई खेळाडूंचे सर्वाधिक वेळा ५ विकेट्स हॉल (सरासरी) :

  • १५- मुथय्या मुरलीधरन (२५.९३)
  • १४ – वसीम अक्रम (२४.८०)
  • ११ – जसप्रीत बुमराह (२१.०९)*
  • ११- इम्रान खान (२६.११)
  • ९ – कपिल देव (३०.७८)

हेही वाचा – SA vs PAK : दक्षिण आफ्रिका WTC फायनलमध्ये; रबाडा-यान्सनच्या निर्णायक भागीदारीसह सेंच्युरियन कसोटीवर कब्जा

तसेच जसप्रीत बुमराहच्या नावावर SENA देशांमध्ये ९व्यांदा ५ विकेट्स हॉल आहेत आणि या यादीत त्याने इम्रान खानला मागे टाकले आहे. इथेही केवळ मुथय्या मुरलीधरन आणि वसीम अक्रम हेच त्याच्या पुढे आहेत.

SENA देशांमध्ये सर्वाधिक पाच विकेट्स हॉल घेणारे आशियाई गोलंदाज :

  • ११ – वसीम अक्रम
  • १० – मुथय्या मुरलीधरन
  • ९ – जसप्रीत बुमराह*
  • ८ – इम्रान खान
  • ७ – कपिल देव

बुमराहने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४ मध्येही ३० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. एका मालिकेत ३० विकेट्स घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज म्हणून तो दुसरा खेळाडू ठरला आहे. कपिल देव यांनी १९७९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदा ही कामगिरी केली होती.

हेही वाचा – IND vs AUS : मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का! स्टार खेळाडू दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज :

  • ३२ – कपिल देव विरुद्ध पाकिस्तान, १९७९
  • ३० – जसप्रीत बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०२४
  • २९ – कपिल देव विरुद्ध वेस्ट इंडीज, १९८३
  • २८ – कपिल देव विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९७९

जसप्रीत बुमराह बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत ३० बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. बीजीटीच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम हरभजन सिंगच्या नावावर आहे, ज्याने २०००-०१ मध्ये ३२ विकेटेस घेतल्या होत्या.

भारतासाठी बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज :

  • हरभजन सिंग – ३२
  • जसप्रीत बुमराह- ३०
  • आर अश्विन- २९
  • अनिल कुंबळे – २७
  • बेन हिल्फेनहॉस – २७