IND vs AUS 4th Test Josh Inglis Ruled Out From BGT 2024 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. मेलबर्नच्या मैदानावर हा सामना होत असून, त्यात चार दिवसांचा खेळ झाला असून अजून एक दिवसाचा खेळ बाकी आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसला आहे. त्याचा बॅकअप यष्टिरक्षक जोश इंग्लिस दुखापतीमुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्षेत्ररक्षण करताना झाली दखापत –

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरू असलेल्या बॉक्सिंग-डे कसोटीदरम्यान पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून क्षेत्ररक्षण करताना जोश इंग्लिस जखमी झाला. त्याला स्ट्रेनची दुखापत झाली आहे. आत्तापर्यंत त्याला या मालिकेतील एकाही सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळालेली नाही. आता इंग्लिसच्या दुखापतीमुळे त्याच्या बिग बॅश लीगमध्ये खेळण्याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत. त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.

अद्याप कसोटी पदार्पण केलेले नाही –

ऑस्ट्रेलियन संघाने अद्याप त्याच्या बदलीची घोषणा केलेली नाही. श्रीलंका दौऱ्यासाठी संघ व्यवस्थापन त्याच्या लवकर फिटनेससाठी प्रार्थना करेल. भारताविरुद्धच्या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियन संघाला लंका संघाविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. इंग्लिशने अद्याप ऑस्ट्रेलियन संघासाठी कसोटी पदार्पण केलेले नाही.

हेही वाचा – IND vs AUS : जसप्रीत बुमराहने लायनचा त्रिफळा उडवत ऑस्ट्रेलियाला लावला ब्रेक, भारताला मिळाले तब्बल ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य

भारताला मिळाले ३४० धावांचे लक्ष्य –

सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव पाचव्या दिवशी २३४ धावांवर आटोपला. भारतासमोर ३४० धावांचे लक्ष्य आहे. पहिल्या डावाच्या आधारे कांगारूंकडे १०५ धावांची आघाडी होती, म्हणजेच एकूण आघाडी ३३९ धावांची होती. पाचव्या दिवशी बोलंड आणि लायन फलंदाजीला आले होते आणि त्यांना १८ मिनिटे क्रीजवर घालवता आली. बुमराहने नॅथन लायनला क्लीन बोल्ड करत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव संपुष्टात आणला आणि त्याचबरोबर आपल्या विकेट्सचे पंचक पूर्ण केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 4th test josh inglis ruled out from border gavaskar trophy 2024 at melbourne vbm