भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अहमदाबाद कसोटी सामन्यात उस्मान ख्वाजा शक्यतो दुसऱ्यांदा फलंदाजीला येणार नाही. उभय संघांतील या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी ख्वाजाने पहिल्या डावात १८० धावांची खेळी केली होती. अशात दुसऱ्या डावात देखील त्याच्याकडून अशाच धमाकेदार प्रदर्शनाची अपेक्षा चाहत्यांना असताना तो खेळणार नसल्याची माहिती मिळाली. सामन्याच्या चौथ्या दिवशी झालेल्या दुखापतीमुळे तो दुसऱ्या डावात खेळणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यात विराट कोहलीने खेळपट्टीवर ती जागा दाखवत अक्षर पटेलला रणनीती सांगितली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अक्षर पटेलने चांगली फलंदाजी केली. त्याने ११३ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७९ धावा केल्या. दुसरीकडे, विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर अहमदाबाद कसोटीच्या चौथ्या दिवशी त्याने १८६ धावांची खेळी केली. कोहलीचे हे कसोटी क्रिकेटमधील २८वे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७५वे शतक आहे. उजव्या हाताच्या अनुभवी फलंदाजाने २४१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विराट कोहलीने तब्बल साडेतीन वर्षांनंतर कसोटी फॉरमॅटमध्ये शतकाचा दुष्काळ संपवला.

Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
Rohit Sharma Statement on India Defeat in Pink Ball Test Said we didnt play well enough to win the game
IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?
Travis Head Statement on Mohammed Siraj Fight and Send Off Said I Said Well Bowled IND vs AUS 2nd Test
Travis Head on Siraj Fight: “मी म्हणालो चांगला चेंडू होता पण त्याने…”, सिराज आणि हेडमध्ये नेमका कशावरून झाला वाद? ट्रॅव्हिस हेडने सामन्यानंतर सांगितलं
IND vs AUS 2nd Test Day 2 Highlights Only Twice Any Team Win Day Night Test After Conceding First Innings Lead
IND vs AUS: ॲडलेड कसोटीत भारताची स्थिती बिकट, दुसऱ्या दिवशी निम्मा संघ तंबूत; ‘हा’ रेकॉर्ड पाहता पराभव टाळणं कठीण
Mohammed Siraj Travis Head fight after wicket in IND vs AUS 2nd test Video
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे

हेही वाचा: WTC Final: मोठी बातमी! मित्राने दिला मदतीचा हात अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना जिंकण्याआधीच टीम इंडियाला मिळाले WTC फायनलचे तिकीट

खेळपट्टीवरील रफ म्हणजेच खडबडीत जागा दाखवत अक्षर पटेलला चेंडू कुठे आणि कसा टाकायचा याचे मार्गदर्शन करत होता. यावर अनेक भारतीय खेळाडूंनी देखील त्या जागेवर येत किती चेंडू फिरकी घेईल याचा अंदाज घेतला. लाबुशेन-स्मिथला कसे बाद करता येईल याची रणनीती कोहलीने अक्षर पटेलला सांगितली. मात्र अजूनही तो खेळपट्टीवर टिकून आहे. हा सामना अनिर्णीत होण्याच्या दिशेने जात असून असे झाल्यास भारत ही मालिका २-१ अशी विजयी होईल.

टीम इंडिया पोहचली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांवरही भारताचे फायनलचे गणित अवलंबून होते. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी अनिर्णीत राहिल्यास श्रीलंकेचा पराभव किंवा ड्रॉ निकाल भारतासाठी फायद्याचा ठरणारा होता. न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत रोमहर्षक विजय मिळवून भारताला मदत केली. भारतासोबत श्रीलंकाही कसोटी वर्ल्ड कप फायनलच्या शर्यतीत होती, परंतु क्राईस्टचर्च कसोटी अनिर्णीत राहिल्याने श्रीलंका शर्यतीतून बाद झाली आणि भारत-ऑस्ट्रेलिया असा फायनल सामना ७ जून पासून ओव्हल येथे खेळवला जाणार आहे.

Story img Loader