India vs Australia 4th Test Playing 11 Prediction: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांना हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकून मालिका २-२ ने संपवण्याची संधी आहे. त्याचबरोबर भारत हा सामना जिंकून मालिका ३-१ ने आपल्या नावावर करेल. यासह भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने नऊ गडी राखून जिंकला. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या संघात कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, भारतीय संघ आपल्या सलामीच्या जोडीमध्ये बदल करू शकतो. याशिवाय भारतीय संघ श्रीकर भरतच्या जागी इशान किशनला टीम इंडियामध्ये यष्टिरक्षक म्हणून घेवू इच्छित आहे.

रोहितचा जोडीदार बदलू शकतो

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये लोकेश राहुलने रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात केली, मात्र दोन्ही सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला. यानंतर राहुल यांच्यावर बरीच टीका झाली होती. वाढत्या दबावामुळे तिसऱ्या सामन्यात राहुलच्या जागी शुबमन गिलला संधी देण्यात आली होती, पण तोही इंदोरमध्ये फार काही करू शकला नाही. अशा परिस्थितीत रोहित पुन्हा एकदा राहुलला संधी देऊ शकतो. मात्र, गिलला आणखी एक संधी द्यावी, अशी प्रशिक्षक द्रविडची इच्छा आहे.

हेही वाचा: WPL 2023: एलिस पेरीने धोनी आणि कोहली यांच्यापैकी कोणाला सलामीचा जोडीदार म्हणून निवडले? जाणून घ्या

तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा आणि चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाचव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा आणि फिरकी जोडीदार म्हणून अश्विन खेळणार आहेत. मात्र, ईशान किशनला टीम इंडियात यष्टिरक्षक म्हणून संधी मिळू शकते. आतापर्यंत श्रीकर भरतने यष्टीमागे छाप पाडली असली तरी फलंदाजीत तो फार काही करू शकला नाही. अशा परिस्थितीत त्याच्या जागी इशान किशनला संधी मिळू शकते.

श्रेयस अय्यर ऐवजी सूर्यकुमार यादव?

चौथ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरवर संघातून बाहेर जाण्याची वेळ येऊ शकते. संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमार यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याची रणनीती आखल्यास अय्यरला बाहेर बसावे लागेल. जेणेकरून सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश करता येईल. सूर्याला पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली पण तो अपयशी ठरला होता.

हेही वाचा: WPL 2023, RCB-W vs GG-W: अस्तित्वाची लढाई! गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघांना विजय आवश्यक

मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाज म्हणून खेळेल याची खात्री आहे. एकदिवसीय मालिकेपूर्वी कर्णधार रोहितने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्यास सिराजला विश्रांती दिली जाऊ शकते. शमी आणि उमेश यादव या स्थितीत खेळू शकतात. या सामन्यापूर्वी हिरव्यागार खेळपट्टीवर सामना होऊ शकतो, अशी चर्चा आहे. या स्थितीत शमी, उमेश आणि सिराज हे तिन्ही वेगवान गोलंदाज खेळू शकतात आणि तिसरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला बाहेर बसावे लागू शकते.

दोन्ही संघातील खेळाडू

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशान किशन , जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव

ऑस्ट्रेलिया संघ: ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशॅने, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मॅथ्यू कुहनेमन, स्कॉट बोलँड, मॅट रेनशॉ, मिचेल स्वीपसन, लान्स मॉरिस

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 4th test last chance to enter in world test championship final might get chance to suryakumar in the team playing 11 avw