भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ बॉर्डर गावसकर ट्रॉफी २०२३ चा चौथा आणि शेवटचा सामना खेळत आहेत. दोन्ही देशांसाठी हा एक खास प्रसंग आहे कारण दोन्ही देश आपल्या मैत्रीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत आहेत. या खास प्रसंगी दोन्ही देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अँथनी अल्बानीज सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले होते. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या खास प्रसंगी दोघांनीही सामन्यापूर्वी आपापल्या संघाच्या कर्णधाराला खास कॅप दिली. यानंतर, जेव्हा सामन्यापूर्वी नाणेफेक झाली तेव्हा पीएम मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पीएम अल्बानीज यांनी खास रथावर स्वार होऊन मैदानात फिरले आणि येथे आलेल्या प्रेक्षकांचे स्वागत केले. बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे स्वागत केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अल्बानीज यांनी आपापल्या देशाच्या कर्णधारांना कसोटी कॅप दिले. तसेच, गोल्फ कार्टमध्ये बसून संपूर्ण मैदानाची चक्कर मारली. सोशल मीडियावर यादरम्यानचा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधत आहे.

यानंतर, दोन्ही पंतप्रधान आपापल्या संघांसह खेळपट्टीजवळ पोहोचले आणि सामन्यापूर्वी राष्ट्रगीतादरम्यान संघासोबत उभे असल्याचे दिसले. ज्या रथात मोदी आणि अल्बानीज यांनी मैदानाची फेरी काढली ती सोन्याचा मुलामा असलेली गोल्फ कार आहे, जी खास आजच्या कार्यक्रमासाठी सजवण्यात आली होती. एका स्थानिक अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले की, “या गोल्फ कारमध्ये पंतप्रधानांनी राष्ट्रीय खेळादरम्यान स्टेडियमची एक फेरी मारली.”

सामन्यातील सध्यस्थिती

पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ७५/२ आहे. कर्णधार स्टीव्ह स्मिथ दोन आणि उस्मान ख्वाजा २७ धावा करत खेळत आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली. ट्रेविस हेड ३२ धावा करून अश्विनच्या चेंडूवर जडेजाने झेलबाद झाला. यानंतर शमीने तीन धावांच्या स्कोअरवर मार्नस लाबुशेनला त्रिफळाचीत केले. मात्र, यानंतर ख्वाजा आणि स्मिथने आणखी एकही विकेट पडू दिली नाही.

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: चौथ्या कसोटीत कर्णधार रोहितने सुधारली मोठी चूक; ‘हा’ फ्लॉप प्लेईंग-११ मधून वगळला, चाहते मात्र नाराज

इंदोर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ आधीच या विजेतेपदासाठी पात्र ठरला आहे. सध्या भारतीय संघ ४ कसोटी सामन्यांच्या या मालिकेत २-१ ने पुढे आहे. ऑस्ट्रेलियाला मालिकेतील शेवटचे दोन कसोटी सामने त्यांचा नियमित कर्णधार पॅट कमिन्सशिवाय खेळावे लागले. कमिन्सची आई गंभीर आजारी आहे आणि अशा परिस्थितीत कमिन्सने हा वेळ आपल्या आई आणि कुटुंबासोबत घालवण्याचा निर्णय घेतला. यामुळे दिल्ली कसोटीनंतर तो मायदेशी परतला. कमिन्सनंतर स्टीव्ह स्मिथ संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 4th test pm modi albanies special caps gift rohit smith before 4th test avw