IND vs AUS 4th Test Match Updates: बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेतील अखेरच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर आव्हान आहे. अखेरच्या कसोटीत कांगारू संघाने भारताचा ९ गडी राखून पराभव करत मालिकेत शानदार पुनरागमन केले. यानंतर टीम इंडियापासून चाहत्यांपर्यंत सर्वजण निराश दिसले. त्याचबरोबर शेवटच्या कसोटीतही ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी टीम इंडियाला सुरुवातीपासूनच बॅकफूटवर ढकलले. पण टीम इंडियाला मैदानात चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळाला.
अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम चाहत्यांनी भरलेले दिसले. ऑस्ट्रेलियासाठी उस्मान ख्वाजाने १८० धावांची शानदार खेळी केली, तर कॅमेरून ग्रीननेही शानदार शतक झळकावले. त्यामुळे पाहुण्या संघाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या. या सगळ्यात भारताच्या फलंदाजीला सुरुवात झाल्यानंतर चाहत्यांकडून एक अप्रतिम नजारा पाहायला मिळाला. यानंतर रोहित शर्मा आणि शुबमन गिलच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्या चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिलने शानदार षटकार ठोकला. त्यानंतर चेंडू प्रेक्षकांमध्ये पडद्यामद्ये हरवला. पंचांनी या चेंडूसाठी काही काळ वाट पाहिली, पण तो चेंडू सापडला नाही. त्यामुळे पंच नवीन चेंडूने खेळ सुरु करणार होते. इतक्यात एका चाहत्याने बराच वेळ चेंडूचा शोध घेतल्यानंतर चेंडू सापडला. चाहत्याने पडद्याच्या आत प्रवेश करुन चेंडू शोधून काढला आणि चेंडू पुन्हा मैदानात फेकला. नवीन चेंडूने खेळताना फलंदाजांना कोणतीही अडचण येऊ नये, यामुळे त्या चाहत्याने देशभक्ती दाखवली. हे दृश्य पाहून रोहित आणि गिलही खुश दिसत होते.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारल्यानंतर संपूर्ण जबाबदारी टीम इंडियाच्या फलंदाजांवर आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी किफायतशीर सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसापर्यंत टीम इंडियाची धावसंख्या बिनबाद ३६ अशी आहे. शुबमन गिल २७ चेंडूत १८ आणि रोहित शर्मा ३३ चेंडूत नाबाद १७ धावांवर खेळत आहे.आता सलामीची जोडी संघाला मोठी सुरुवात देण्यात यशस्वी ठरते की नाही हे पाहावे लागेल.
आर अश्विनने अनिल कुंबळेचा विक्रम मोडला –
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत आर अश्विन आता पहिल्या क्रमांकावर आला आहे. त्याने अनिल कुंबळेला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले, ज्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत या ट्रॉफीमध्ये २० सामन्यांत ३८ डावांत एकूण १११ बळी घेतले. या ट्रॉफीमध्ये कुंबळेची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे एका डावात १४१ धावांत ८ बळी, तर सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे १८१ धावांत १३ विकेट्स.