India vs Australia 4th Test Match Timing in India: भारत वि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या २६ डिसेंबरला सुरू होणार आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. दरम्यान, विशेष बाब म्हणजे मालिकेतील हा सामनाही बदललेल्या वेळेनुसार सुरू होणार आहे. हा सामना थेट पाहण्यासाठी पहिली अट म्हणजे चाहत्यांना सकाळी लवकर उठावे लागेल.
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील सुरूवातीचे तिन्ही सामने वेगवेगळ्या वेळेत सुरू झाले होते. पण महत्त्वाचं म्हणजे तिन्ही कसोटी सामन्यांपेक्षा मेलबर्न कसोटी सामना हा लवकर सुरू होणार आहे. तर सिडनी कसोटी सामनाही याच वेळेनुसार सुरू होणार आहे.
u
सकाळी ४.३० वाजता होणार नाणेफेक
मेलबर्न येथे होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय वेळेनुसार पहाटे ४.३० वाजता नाणेफेक होईल. अर्ध्या तासानंतर म्हणजे ५ वाजता सामना सुरू होईल. पहिल्या दिवशी नाणेफेक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कसोटी सामन्याचं पहिलं सत्र सकाळी ५ वाजता सुरू होऊन ७ वाजेपर्यंत खेळवले जाईल. यानंतर ७ ते ७.४० लंच ब्रेक असेल. ७.४० वाजता दुसरं सत्र होईल जे ९.४० पर्यंत खेळवले जाईल. दिवसाचे तिसरे आणि अखेरचे सत्र १० वाजता सुरू होईल जे १२ वाजेपर्यंत खेळवले जाईल.
पाऊस न पडल्यास वरील वेळांनुसार सत्र खेळवली जातील. गेल्या कसोटी सामन्यातही पावसामुळे पूर्ण सत्र खेळवली गेली नव्हती आणि त्यामुळे सामना लवकर सुरू होऊन निश्चित वेळेपेक्षा उशिरापर्यंत खेळवला गेला होता. त्याचबरोबर भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह पाहता येईल तर डिस्ने प्लस हॉटस्टार या मोबाईल अॅपवर लाईव्ह टेलिकास्ट पाहता येणार आहे.