IND vs AUS What is the Boxing Day Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका आता अशा टप्प्यावर आहे, जिथे त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील हा चौथा सामना असला तरी ही मालिका नुकतीच सुरू झाल्यासारखे वाटते. कारण तीन सामन्यांनंतरही मालिका बरोबरीत आहे. क्रिकेटमध्ये बॉक्सिंग डे म्हणजे काय? ही परंपरा कधीपासून सुरू झाली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा कसोटींमध्ये भारतीय संघाची आतापर्यंत कामगिरी कशी राहिली आहे, जाणून घेऊया.

बॉक्सिंग डे कसोटी म्हणजे काय?

ख्रिसमसनिमित्त ऑस्ट्रेलियात सुट्टी असल्याने जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. बॉक्सिंग डे ही अशी कसोटी आहे, ज्यात क्रिकेट चाहते सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. वास्तविक बॉक्सिंग डेची परंपरा १९५० च्या दशकापासून सुरू आहे. पण काळानुसार त्यात बदल होत गेले. १९७४ मध्ये प्रतिष्ठित ॲशेस मालिकेदरम्यान २६ डिसेंबर रोजी प्रथमच बॉक्सिंग डे कसोटी सुरू झाली. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरही हा सामना खेळला गेला.

विशेष म्हणजे यावेळी बॉक्सिंग डे टेस्टची सर्व तिकिटे मॅच सुरू होण्याच्या दोन आठवडे आधीच विकली गेली होती, यावरून या सामन्याची उत्सुक्ता कळू शकते. ख्रिसमसला मिळालेल्या भेटवस्तू या दिवशी उघडल्या जातात आणि सुट्टीचा दिवस असतो, म्हणून त्याला बॉक्सिंग डे टेस्ट म्हणतात. याचा बॉक्सिंग या खेळाशी काहीही संबंध नाही.

हेही वाचा – IND vs AUS : रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! ‘या’ स्टार खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून दाखवला बाहेरचा रस्ता

u

बॉक्सिंग डे कसोटीत भारताचा इतिहास –

भारतीय संघाबद्दल बोलायचे, तर टीम इंडियाने आतापर्यंत ९ बॉक्सिंग डे टेस्ट खेळल्या आहेत. यापैकी टीम इंडियाला केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत. केवळ दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. तसेच टीम इंडियाला पाच सामने गमावले आहेत. ही काही विशेष कामगिरी नाही. पण घाबरण्यासारखे काहीच नाही, कारण भारतीय संघाने २०११ पासून एकही बॉक्सिंग डे कसोटी गमावलेली नाही. म्हणजे सुमारे १३ वर्षांत भारताची कामगिरी चांगली राहिली आहे.

हेही वाचा – खेळाडूंच्या क्षमतेची कसोटी ; भारत- ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या बॉर्डरगावस्कर करंडकाचा चौथा सामना आजपासून

२०११ नंतर भारताने २०१४ मध्ये बॉक्सिंग डे कसोटी खेळली, जी अनिर्णित राहिली. यानंतर २०१८ आणि २०२१ मध्ये भारतीय संघ बॉक्सिंग डे कसोटी जिंकण्यात यशस्वी ठरला. हे आकडे भारतीय संघासाठी दिलासा देणारे आहेत.आतापर्यंत फक्त चार भारतीय कर्णधार राहिले आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मेलबर्न येथे कसोटी सामना जिंकला आहे. या यादीत बिशन सिंग बेदी, सुनील गावस्कर, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या नावांचा समावेश आहे.

Story img Loader