IND vs AUS Yashasvi Jaiswal and Mitchell Starc Video : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील चौथी कसोटी एमसीजी येथे खेळवली जात आहे. पाचव्या दिवशी या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ३४० धावांचे लक्ष्य दिले आहे. दोन्ही संघ विजयासाठी मैदानात घाम गाळत आहेत. दोन्ही संघ आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. दरम्यान, मिचेल स्टार्क आणि यशस्वी जैस्वाल यांच्यातील मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वास्तविक, ऋषभ पंतला चेंडू टाकल्यानंतर मिचेल स्टार्क पुन्हा रनअपसाठी जात होता. जाता-जात, त्याने नॉन-स्ट्रायकर एंड असलेल्या बेल्स उचलल्या आणि त्या बदलून पुन्हा ठेवल्या. यानंतर यशस्वी जैस्वालनेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. नॉन स्ट्राईक एंडला उभ्या असलेल्या लगेच स्टंप जवळ गेला आणि मिचेल स्टार्कने बदलल्या बेल्स पुन्हा होत्या तशा ठेवल्या. त्याच्या या कृतीने सर्वांचे लक्ष वेधले, ज्याचा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे.

Ashneer Grover Viral Video
Viral Video : “नाम नहीं जानता, तो बुलाया क्यों…”, ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हरचे सलमान खानला प्रत्युत्तर; येथे पाहा Video
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”
Start a business in a place you can't even imagine; You will be speechless after watching the pune city video viral
पुणेकरांचा नाद नाय! अशा ठिकाणी सुरु केला व्यवसाय की तुम्ही विचारही करु शकत नाही; VIDEO पाहून म्हणाल मानलं पठ्ठ्याला
Walmik Karad, Dhananjay Munde
“फरार असताना वाल्मिक कराडने संपत्तीचं…”, ठाकरे गटाला वेगळाच संशय; धनंजय मुंडेंचा उल्लेख करत म्हणाले…
Shiva
Video : “मी सगळं केलं…”, दिव्याचे सत्य समोर आल्यावर शिवा तिच्या कानाखाली देणार; पाहा मालिकेत पुढे काय घडणार?
Eagle vs crab thrilling fight shocking video went viral on social media
“वेळ प्रत्येकाची येते विश्वास ठेवा” चिमुकल्या खेकड्यानं भल्यामोठ्या गरुडाला अक्षरश: हतबल केलं; लढतीचा VIDEO पाहून थक्क व्हाल

स्टार्क-जैस्वालचा व्हिडीओ व्हायरल –

यशस्वी जैस्वालने बदलल्या बेल्स पुन्हा होत्या तशा ठेवल्यानंतर मिचेल स्टार्कला एक प्रश्न विचारला. मिचेल स्टार्कने यशस्वीला विचारले, ‘तुझा अंधश्रद्धेवर विश्वास आहे का?’ याला उत्तर देताना जैयस्वाल म्हणाला, ‘मला फक्त माझ्यावर विश्वास आहे.’ जैस्वाल आणि स्टार्क यांच्यात पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीपासून लढाई सुरू आहे. त्या सामन्यापासून दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे.

हेही वाचा – IND vs AUS : रोहित-विराटच्या विकेटनंतर अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीच्या रिॲक्शनने वेधले लक्ष, फोटो होतायेत व्हायरल

भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. संघाने अवघ्या ३३ धावांवर तीन विकेट्स गमावल्या. रोहित नऊ धावा आणि कोहली पाच धावा करून बाद झाला. केएल राहुल खातेही उघडू शकला नाही. यानंतर यशस्वीने आणखी पडझड होऊ न देता संघाचा डाव सावरताना कसोटी कारकीर्दीतील दहावे अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर आतापर्यंत त्याने ऋषभ पंतसोबत ५३ धावांची भागीदारी केली आहे. आज अजून ५२ षटकांचा खेळ बाकी असून भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात ८६ धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी अजून २५४ धावांची गरज आहे.

Story img Loader