What are The 5 Reasons of India Defeat in BGT: भारतीय संघाला नमवत ऑस्ट्रेलियाने तब्बल १ दशकाच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर कब्जा केला आहे. सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ विकेट्सने पराभव करत ही मालिका ३-१ च्या फरकाने जिंकली आहे. या संपूर्ण मालिकेत भारतीय संघाच्या कामगिरीत चढउतार पाहायला मिळाले. भारतीय संघाती फलंदाजी बाजू अशी भारताच्या पराभवाची ५ कारणं जाणून घेऊया.
भारताची फलंदाजी फळी
संपूर्ण स्पर्धेत भारतासाठी सर्वात मोठी त्रुटी म्हणजे निर्णायक क्षणांमध्ये दबावाचा सामना करण्यात अपयश आले. विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुबमन गिल या स्टार फलंदाजांसाठी सजलेली भारताची फलंदाजी फळी सामन्यात प्रभावी कामगिरी करू शकली नाही. भारताच्या फलंदाजांना महत्त्वाच्या सामन्यांमध्ये २०० धावांचा टप्पा गाठता आला नाही, त्यामुळे गोलंदाजांनाही मोठी धावसंख्या नसल्याने धावांचा बचाव करण्यात अपयश आले. भागीदारी करण्यात आलेले अपयश आणि एकापाठून एक झटपट गमावलेले विकेट्स यामुळे भारत या सामन्यात मागे पडला.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय टॉप ऑर्डरला अडचणीत आणले होते. भारताच्या गोलंदाजांनी फलंदाजीतही योगदान देत भारताच्या धावांमध्ये भर घातली बुमराह आणि आकाशदीप यांच्या भागीदारीने भारताला फॉलोऑनपासून वाचवले होते. तर केएल राहुल-जैस्वाल आणि नितीश रेड्डी-वॉशिंग्टन सुंदर या जोडींना मोठी भागीदारी रचता आली.
मोक्याच्या क्षणी कच खाणे
जसप्रीत बुमराहने या मालिकेत अद्वितीय गोलंदाजीचे प्रदर्शन करत भारताला वेळोवेळी सामन्यात परत आणले. बुमराहने १३.०६ च्या सरासरीने मालिकेत सर्वाधिक ३२ विकेट्स घेतल्या, यासह बुमराहला मालिकावीर म्हणूनही घोषित करण्यात आले. तरीही वस्तुस्थिती अशी होती की बुमराहला विकेट घेण्यात मदत करणारा गोलंदाज नव्हता. मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी केली पण त्याला फार विकेट मिळवता आल्या नाहीत. तर आकाशदीपनेही योग्य लाईन आणि लेंग्थसह गोलंदाजी केली पण तो विकेट मिळवण्यात अपयशी ठरला. मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा एखाद सामन्यात चांगली कामगिरी करू शकले. जसप्रीत बुमराहला पूरक ठरणारा दुसरा वेगवान गोलंदाज नसल्याने भारताला ऑस्ट्रेलियन फलंदाजी क्रमावर सतत दबाव आणता आला नाही. तर मोहम्मद शमीचीही कमी संघाला जाणवली.
रोहित-विराटचा फॉर्म
भारताचे दोन सर्वात विश्वासार्ह फलंदाज, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीने सर्वांनाच निराश केले आहे. पहिल्या कसोटीला मुकल्यानंतर, महत्त्वपूर्ण धावा करण्यात अपयशी ठरल्यानंतर रोहित संपूर्ण मालिकेत धावा करण्यात अपयशी ठरला, ज्यामुळे मधल्या फळीवर प्रचंड दबाव आला. रोहित शर्माच्या फॉर्मचा दबाव रोहितच्या नेतृत्त्वावरही झाल्याचं पाहायला मिळत होतं. न्यूझीलंड कसोटी मालिकेपासूनच रोहित शर्मा खराब फॉर्ममधून जात होता. रोहित शर्माने सिडनी कसोटीत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्यावर रोहित कसोटीतून निवृत्ती घेणार अशी चर्चा होती, पण रोहित शर्माने ही अफवा फेटाळून लावत पुनरामन करण्याचा विश्वास दाखवला.
विराट कोहली, भारताच्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असूनही, चांगली सुरूवात करून मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरला. पर्थमध्ये त्याने शतक झळकावले पण पुढील सर्व सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला. आव्हानात्मक ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर वर्चस्व गाजवण्यात माहीर असलेल्या विराटने निराश केले. त्यामुळे भारताच्या फलंदाजीत मोठी पोकळी निर्माण झाली. आघाडीच्या फळीकडून महत्त्वपूर्ण योगदान न मिळाल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारणं अवघड झालं.
संघ संयोजन
भारताच्या कामगिरीचा सर्वात वादग्रस्त पैलू म्हणजे संघ निवड. प्लेईंग इलेव्हनमध्ये प्रत्येक सामन्यासाठी बदल झाले आणि पण अपेक्षित निकाल मिळाला नाही. रोहित-विराट वगळता इतर कोणताच फार अनुभवी फलंदाज संघात नव्हता. पुजारा-रहाणेसारख्या खेळाडूंना यंदाच्या ऑस्ट्रेलिया मालिकेत संधी दिली नाही. अजिंक्य रहाणे तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. याचबरोबर हर्षित राणाला पहिल्याच सामन्यासाठी पदार्पणाची संधी दिली पण पहिला सामना वगळता त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्याऐवजी प्रसिध कृष्णाला संधी देता आली असती.
प्रसिध कृष्णाला उशिरा संधी