IND vs AUS 5th Test Irfan Pathan on Rohit Sharma : अलीकडेच, टीम इंडियामधील अंतर्गत कलहाच्या बातम्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली होती. दरम्यान, आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत रोहित शर्माचे सिडनी कसोटीतून स्वत:ला विश्रांती देणे हा मुद्धा चर्चेत आहे. रोहित शर्माने हा निर्णय घेण्या मागे त्याचा खराब फॉर्म आणि ड्रेसिंग रुममधील कलह कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. कारण सध्या कर्णधार रोहित आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील मतभेदाची चर्चा वाढत आहे. या सर्व घटना पाहून इरफान पठाणने रोहित शर्माच्या या मोठ्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
रोहितबद्दल इरफान पठाण काय म्हणाला?
रोहित शर्माबद्दल बोलताना इरफान पठाण म्हणाला, “रोहित शर्मा विचार करत आहे की बॅट अजिबात चालत नाहीये. हे स्वतः फलंदाजाला कळतं की तो लढण्याच्या मूडमध्ये नाहीये. ज्यामुळे कदाचित रोहितला वाटलं असेल की अशा परिस्थितीत ब्रेक घेणं चांगलं आहे. त्याने संघाचा विचार केला की शुबमन गिल चांगला खेळत होता. त्यामुळे त्याने स्वत: विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. कर्णधार असताना स्वत:ला संघातून बाहेर करणे, हे प्रत्येक खेळाडू करु शकत नाही.”
रोहित शर्माने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये कर्णधार आणि फलंदाज म्हणून अत्यंत खराब राहिली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माची बॅट पूर्णपणे शांत राहिली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील त्याने ५ डावात फक्त ३१ धावा केल्या आहेत. अशा स्थितीत कसोटी क्रिकेटमधील रोहित शर्माचा कारकीर्द समाप्त होण्याचा अगदी जवळ आल्याचे दिसते.
हेही वाचा – Virat Kohli Catch : OUT की NOT OUT? विराट कोहलीला जीवनदान मिळाल्याने स्मिथ अंपायरवर नाराज, पाहा VIDEO
रोहित शर्माचा नि:स्वार्थी निर्णय – इरफान पठाण
इरफान पठाण पुढे म्हणाली की, रोहित शर्माने आपला अहंकार बाजूला ठेवून हा निर्णय घेतला आहे. तो म्हणाला, “हा नि:स्वार्थी निर्णय आहे. आज रोहित शर्माने जे केले आहे, ते तुम्हाला जगातील कोणत्याही कर्णधाराने करताना दिसणार नाही. जेव्हा तुम्हाला सुरक्षित वाटत असते, तेव्हा असे घडते.” सिडनी कसोटीत रोहितच्या जागी जसप्रीत बुमराह कर्णधार आहे. सिडनी कसोटी रोहित शर्माने स्वत:ला विश्रांती देण्याचा पर्याय निवडल्यानंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियाची धुरा सांभाळत आहे.
हेही वाचा – Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माच्या गैरहजेरीत भारतीय संघाचा कसोटीत कसा राहिलाय रेकॉर्ड? जाणून घ्या
कार्यवाहक कर्णधार जसप्रीत बुमराहने पाचव्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम गोलदाज करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. भारताची टॉप ऑर्डर पुन्हा अपयशी ठरली आहे. आघाडीचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. लंच ब्रेकपूर्वी भारताला शुभमन गिलच्या रुपाने तिसरा धक्का विकेट मिळाली. लंच ब्रेकपर्यंत टीम इंडियाने पहिल्या डावात तीन विकेट्स गमावून ५७ धावा केल्या. विराट कोहली १२ धावा करून नाबाद आहे. लंचपूर्वी पहिल्या चेंडूवर नॅथन लायनने गिलला स्मिथच्या हाती झेलबाद केले. त्याला २० धावा करता आल्या. गिलने कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. त्याचवेळी यशस्वी १० धावा करून स्कॉट बोलंडचा तर राहुल चार धावा करून मिचेल स्टार्कचा बळी ठरला.