IND vs AUS 5th Test Rishabh Pant biceps Injury : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना सिडनी येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माने खराब फॉर्ममुळे स्वत:ला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. कार्यवाहक कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेतला. यानंतर अवघ्या ७२ धावांवर ४ विकेट्स गमावल्यानंतर भारतीय संघ अडचणीत आला होता. यानंतर ऋषभ पंतने आणि रवींद्र जडेजानसह भारतीय संघाचा डाव सावरला. यादरम्यान चाहत्यांच्या नजरा ऋषभ पंतवर खिळल्या असताना मिचेल स्टार्कच्या षटकात त्याला दुखापत झाली. त्यानंतर ऋषभ पंत पट्टी बांधून खेळताना दिसला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऋषभ पंतच्या बायसेप्सला दुखापत –

वास्तविक, ही घटना भारतीय डावाच्या ३७ व्या षटकात घडली. या षटकातील मिचेल स्टार्कचा वेगवान चेंडू ऋषभ पंतच्या बायसेप्सला लागला, तो चेंडू इतका वेगवान होता की त्याने पंतच्या बायसेप्सवर छाप सोडली. यावेळी बराच वेळ खेळ थांबला होता, पण चांगली गोष्ट म्हणजे भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. यानंतर फिजिओने पंतला मलमपट्टी केली आणि त्यानंतर तो खेळताना दिसला.

सिडनीच्या गवताळ खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खेळपट्टीवर पडल्यानंतर चेंडू काटा बदलताना दिसत आहे, ज्यामुळे त्यांना त्रास होत आहे. याच कारणामुळे ऋषभ पंतच्या अंगावर अनेक चेंडू लागले. भारतीय फलंदाजाला दुखापत झाल्यामुळे सामना २-३ वेळा थांबवण्यात आला. ऋषभच्या हातावर एकदा चेंडू लागल्यानंतर लगेच पुन्हा पुढच्या षटकात एक वेगवान चेंडू ऋषभ पंतच्या हेल्मेटला लागला. पंत खूप लढाऊ खेळी खेळत आहे आणि टीम इंडियाला सध्या त्याच्याकडून अशाच खेळीची गरज आहे.

हेही वाचा – IND vs AUS : विराटने पुन्हा केलं निराश! मालिकेतील ८ पैकी ७ डावात एकाच प्रकारे आऊट, पाहा VIDEO

मिचेल स्टार्कने जिंकली मनं –

ऋषभ पंतच्या हेल्मेटला चेंडू लागताच मिचेल स्टार्क पुढे आला आणि त्याने पंतची प्रकृती जाणून घेतली. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या फिल ह्यूजचा डोक्याला चेंडू लागल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे जेव्हा जेव्हा सामन्यादरम्यान अशी घटना घडते तेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटतात. कपाळावर सुरकुत्या घेऊन पंतच्या प्रकृतीची विचारपूस करायला आलेल्या स्टार्कसोबतही असेच काहीसे घडले. याआधी मिचेल स्टार्कचा एक चेंडू पंतच्या बाईसेपवर लाल-निळा छाप उमटली होती.