IND vs AUS Sydney Test India Probable Playing XI: भारत-ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा अखेरचा सामना सिडनीमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांचा महत्त्वाचा असणार आहे कारण या सामन्यावरूनच मालिका विजयाचा निकाल लागणार आहे. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचा संघ २-१ ने मालिकेत पुढे आहे. त्यामुळे भारताला सिडनी कसोटी जिंकणं महत्त्वाचं असणार आहे. ऑस्ट्रेलियाने आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली असून भारताची प्लेईंग इलेव्हन कशी असेल, जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने त्याचा फॉर्म पाहता सिडनी कसोटीत विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तातून समोर आली आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, संघाचा वेगवान गोलंदाज आकाशदीप दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज हर्षित राणाला किंवा प्रसिध कृष्णाला संधी मिळू शकते.

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्मा सिडनी कसोटीत विश्रांती घेणार; बुमराहकडे नेतृत्वाची धुरा

याशिवाय इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतलाही वगळले जाऊ शकते. असे झाल्यास ध्रुव जुरेलचा संघात समावेश होऊ शकतो. शुभमन गिललाही सिडनीत संधी मिळू शकते. गिलने संघात प्रवेश केल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर किंवा रवींद्र जडेजा यांना वगळण्यात येईल.

हेही वाचा – IND vs AUS: “खेळाडू आणि कोचमधील वाद…”, कोच गंभीरचं सिडनी कसोटीपूर्वी समोर आलेल्या ड्रेसिंग रूममधील वादावर मोठं वक्तव्य

ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. अष्टपैलू मिचेल मार्शच्या जागी ३१ वर्षीय ब्यू वेबस्टरचा संघात समावेश केला आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणारा वेबस्टर हा तिसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी, नॅथन मॅकस्विनीने पर्थ कसोटीत पदार्पण केले होते आणि सॅम कोन्स्टासने मेलबर्नमध्ये पदार्पण केले होते.

हेही वाचा – NZ vs SL: ४४ चेंडूत शतक ! श्रीलंकेकडून टी-२०मध्ये १३ वर्षांत पहिल्यांदाच केलं शतक, कुशल परेराचा सर्वात जलद शतकाचा विक्रम

सिडनी कसोटी सामना किती वाजता सुरू होणार?

भारत ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटी भारतीय वेळेनुसार पहाटे ५ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक पहाटे ४.३० वाजता होईल. तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील हा अखेरचा कसोटी सामना स्टार स्पोर्ट्स आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

हेही वाचा – IND vs AUS: सिडनी कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू झाला संघाबाहेर; गौतम गंभीरने दिली माहिती

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत/ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर/रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 5th test predicted playing 11 full squad players list match timing live telecast bdg