Virat Kohli hugging Glenn Maxwell and gifting him a jersey after World Cup final 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिंम सामना रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव करत विक्रमी सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे सहकारी विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी एकमेकांना मिठी मारली. या दरम्यान विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला आपली जर्सी भेट दिली. ज्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला. सामना संपल्यानंतर एकीकडे ऑस्ट्रेलियन खेळाडू आनंदाने उड्या मारत एकमेकांना मिठी मारत होते. दुसरीकडे, भारतीय खेळाडूंचे मन दु:खी झाले होते आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. सामन्यानंतरदोन्ही संघातील खेळाडू हस्तांदोलन करण्यासाठी एकमेकांसमोर आले असता,कोहली आणि मॅक्सवेलने एकमेकांना घट्ट मिठी मारली. यानंतर विराट कोहलीने आयपीएलमधील आपल्या संघसहकाऱ्याला त्याची जर्सी भेट दिली.

IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
Sanju Samsons six hits fan
Ind vs SA: संजू सॅमसनच्या षटकाराने चाहती घायाळ
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
shams mulani
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईकडून ओडिशाचा डावाने धुव्वा

सामन्याबद्दल बोलायचे तर, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रथम फलंदाजी करायला उतरलेला भारतीय संघ ५० षटकांत २४० धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत ४ विकेट गमावत २४१ धावा करत सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक १३७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. मार्नस लाबुशेनने नाबाद ५८ धावा केल्या.

हेही वाचा – Australia Won World Cup 2023 Final: वर्ल्ड कपची ट्रॉफी पायाखाली! मिशेल मार्शच्या ‘या’ कृतीवरून वादंगाची शक्यता

तत्पूर्वी, भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ आणि विराट कोहलीने ५४ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने ४७ आणि सूर्यकुमार यादवने १८ धावा केल्या. कुलदीप यादवने १० धावांचे योगदान दिले. या पाच खेळाडूंशिवाय इतर कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. त्याचबरोबर भारताचे तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकले होते, मात्र ११व्या सामन्यात संघ मागे पडला. भारताला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाने शेवटचा पराभव २००३ मध्ये केला होता.