IND vs AUS 4th Test: गुरुवारपासून (दि. ९ मार्च) अहमदाबाद येथे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना घाम फोडत अर्धशतकी भागीदारी केली होती. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दम दाखवत पाहुण्या संघाला धक्के देण्यास सुरुवात केली. मोहम्मद शमीच्या जबरदस्त चेंडूंनी मार्नस लाबुशेन आणि पीटर हँड्स्कॉंबला क्लीन बोल्ड केले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरला, मात्र नंतर टीम इंडियाने दमदार पुनरागमन केले आणि प्रथम अश्विनने ट्रॅव्हिस हेडला बाद केले, तर नंतर शमीने लाबुशेनला धोकादायक चेंडू टाकून गोलंदाजी केली. जेव्हाही भारतीय संघ अडचणीत असतो, तेव्हा आर अश्विन मैदानावर येत संघाला यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलतो. यावेळीही त्याने असेच काहीसे केले. अहमदाबाद कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ट्रेविस हेड भारतीय गोलंदाजांविरुद्ध बॅटमधून धावांचा पाऊस पाडत होता. मात्र, अश्विनने त्याच्या गाडीला ब्रेक लावला.

Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Arshdeep Singh Becomes India Most Successful T20I Fast Bowler Surpasses Jasprit Bumrah and Bhuvneshwar Kumar with 92 Wickets IND vs SA
IND vs SA: अर्शदीप सिंगने बुमराह-भुवनेश्वरला मागे टाकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल

लाबुशेन आणि पीटर हँड्स्कॉंबला मोहम्मद शमीने क्लीन बोल्ड केले

भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी अहमदाबाद कसोटीत एका सामन्याच्या विश्रांतीनंतर परतला. शमीचा पहिला स्पेल काही खास नव्हता आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही आणि त्याने धावाही सोडल्या. नंतर, २३व्या षटकात, तो पुन्हा गोलंदाजीसाठी आला आणि त्याने येताच लाबुशेनला आश्चर्यचकित केले. सामन्याच्या २३व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर लाबुशेनला चकवले. त्याचवेळी लाबुशेन त्याच्या दुसऱ्या चेंडूवर शॉट मारायला गेला. पण शमीने चेंडू थेट रूटमध्ये फेकला. चेंडूचा वेग इतका वेगवान होता की चेंडू लाबुशेनच्या बॅटला आदळला आणि थेट स्टंपमध्ये घुसला आणि फलंदाज आश्चर्यचकित झाला. त्यामुळे कांगारूंना पहिला धक्का बसला.

पीटर हँड्स्कॉंबलाही त्याच पद्धतीने बाद करत टीम इंडियाला सामन्यात परत आणण्यास मदत केली. मोहम्मद शमीने १७० धावांच्या स्कोअरवर ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का दिला आहे. त्याने पीटर हँड्सकॉम्बला क्लीन बोल्ड केले. लेग साईडला खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू हलकासा आऊटस्विंग झाला आणि त्याच्या दांड्या गुल झाल्या. हँड्सकॉम्बने २७ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने १७ धावा केल्या. आता कॅमेरून ग्रीन उस्मान ख्वाजासोबत खेळपट्टीवर आहे. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ७२ षटकांत ४ बाद १७४ अशी आहे.

हेही वाचा: IPL 2023 Promo Video: आयपीएल २०२३चा प्रोमो रिलीज! या Video मध्ये एमएस धोनी नसल्याने चाहते भडकले

भारतीय संघ मालिकेत २-१ने आघाडीवर

या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथ याच्या खांद्यावर आहे. या मालिकेत भारतीय संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. संघ मालिकेत २-१ने आघाडीवर आहे. अशात या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. कारण, या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मार्ग मोकळा होणार आहे.