IND vs AUS Adam Gilchrist and Michael Vaughan criticized Australia : दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्टने रविवारी पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताविरुद्ध नकारात्मक रणनीती अवलंबल्याबद्दल ऑस्ट्रेलियन संघावर टीका केली. त्याचबरोबर मायकल वॉनने ऑस्ट्रेलियन संघावर निराशा व्यक्त केली आहे. यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर भारताने दुसरा डाव ६ गड्यांच्या मोबदल्यात ४८७ धावांवर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियन संघाला विजयासाठी ५३४ धावांचे मोठे लक्ष्य दिले.
ॲडम गिलख्रिस्ट ऑस्ट्रेलिया संघावर नाराज –
ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे गोलंदाज भारतीय फलंदाजांपुढे पूर्णपणे हतबल दिसले. ज्यामुळे कर्णधार पॅट कमिन्सने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणण्यासाठी मार्नस लॅबुशेनच्या हाती चेंडू सोपवण्याचा निर्णय घेतला. यावर ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी टीका केली. गिलख्रिस्ट आणि मायकेल वॉन या दोघांनीही लॅबुशेनच्या नकारात्मक रणनीतीवर चिंता व्यक्त केली. गिलख्रिस्ट म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या अशा निराश संघाला कधी नकारात्मक रणनीती अवलंबताना तुम्ही कधी पाहिले आहे का? नियमांच्या पुस्तकानुसार नकारात्मक रणनीती काय आहे?’
मायकेल वॉननेही केली टीका –
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन म्हणाला की, ऑस्ट्रेलियन संघाचा असा दृष्टिकोन मी कधीच पाहिला नव्हता. फॉक्स क्रिकेटवर वॉन म्हणाला, ‘मी ऑस्ट्रेलियन संघ असा कधीच पाहिला नाही.’ ऑस्ट्रेलियन खेळाडूंची कामगिरी आणि डावपेच पाहून क्रीडा चाहत्यांनीही सोशल मीडियावर निराशा व्यक्त केली. वृत्त लिहेपर्यंतऑस्ट्रेलियाने ५३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात चार विकेट्स गमावल्या आहेत.
हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा पराक्रम! शतकी खेळीनंतर ‘या’ बाबतीतही सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
u
u
नॅथन मॅकस्विनी खाते उघडू शकला नाही, तर पॅट कमिन्स दोन धावा करून बाद झाला आणि मार्नस लॅबुशेन तीन धावा करून बाद झाला. उस्मान ख्वाजा चार धावा करू शकला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना बुमराह आणि सिराज आतापर्यंत दोन विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने १९ षटकानंतर ४ बाद ५२ धावा केल्या आहेत. सध्या स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड खेळत आहेत.