Akshar Patel on World Cup 2023: भारतीय फिरकीपटू अक्षर पटेलने कबूल केले की, दुखापतीमुळे एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर तो निराश झाला होता आणि त्याला सावरण्यासाठी एक आठवडा लागला. या २९ वर्षीय खेळाडूची विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली होती, परंतु आशिया चषकादरम्यान त्याला दुखापत झाल्यामुळे त्याला बाहेर पडावे लागले. त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनचा विश्वचषक संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यानंतर अक्षरने पत्रकारांना सांगितले की, “निश्चितच यामुळे कोणाचीही निराशा झाली असेल. वर्ल्ड कप भारतात होत होता पण मला दुखापत झाली. सुरुवातीचे काही दिवस मी दुखापतीमुळे खेळू शकणार नाही असा विचार करत होतो आणि तसेच झाले.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डावखुरा फिरकीपटू म्हणाला, “मी जरी नसलो तरी संघ चांगली कामगिरी करत होता, त्यामुळे ५-१० दिवसांनी मी पुन्हा सराव सुरू केला. जेव्हा तुम्ही दुखापतीमुळे बाहेर असता आणि त्या ५-१० दिवसांत काहीही करू शकत नाही, तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटते. यानंतर मी माझी नेहमीची दिनचर्या सुरू केली.” ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत पुनरागमन करणारा अक्षर म्हणाला, “विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर मी निराश झालो होतो, पण दुखापतीमुळे असे होतेच, यावर कोणाचेही नियंत्रण नसते आणि हा खेळाचा भाग आहे.”

हेही वाचा: IND vs AUS: फक्त १९ धावा…; बंगळुरूमध्ये ऋतुराज गायकवाड मोडणार कोहलीचा विक्रम? जाणून घ्या

तो पुढे म्हणाला, “जर तू दुखापतीमुळे काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर राहिल्यानंतर पुनरागमन करत असेल तर तू स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोस. याबरोबरच तुम्हाला तुमच्या शरीराचीही काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे मी एका वेळी फक्त एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करत होतो.” एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळू न शकल्यानंतर अक्षरला आता पुढील वर्षी जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळायचे आहे आणि तो म्हणाला की, “त्यासाठीची माझी तयारी सुरू झाली आहे.”

अक्षर पुढे म्हणाला, “टी-२० विश्वचषकापूर्वी, मला वाटत नाही की भारताला जास्त टी-२० सामने खेळावे लागतील, त्यामुळे आम्हाला आत्तापासूनच नियोजन करावे लागेल. यामागील कारण म्हणजे, विश्वचषक जूनमध्ये आहे आणि त्यादरम्यान आयपीएल देखील होणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.” तो पुढे म्हणाला, “सर्व खेळाडूंना त्यांची भूमिका समजावून सांगितली आहे, त्यांना कोणत्या पदावर खेळायचे आहे आणि राहुल (द्रविड) सर परत आल्यावर सविस्तर चर्चा केली जाईल, पण आम्हाला याची माहिती आहे. या मालिकेत आपल्याला काय करायचे आहे ते आम्ही केले, त्यामुळे यात शंका नाही.”

हेही वाचा: IPL 2024: “ऋषभ पंत सीएसकेमध्ये एम.एस. धोनीची…”, माजी भारतीय क्रिकेटपटूने केली मोठी भविष्यवाणी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी अक्षराची संघात निवड करण्यात आलेली नाही आणि त्याच्या जागी रवींद्र जडेजाचा समावेश करण्यात आला आहे. चौथ्या टी-२०मध्ये १६ धावांत तीन विकेट्स घेणाऱ्या अक्षरला स्वतःला सिद्ध करायचे आहे का, असे विचारले असता तो म्हणाला, “नाही, तसे नव्हते. जर मी धावा जास्त दिल्या असत्या तर तुम्ही म्हणाल की याला संघाची काळजी वाटत नाही, त्यामुळे मी आरामात गोलंदाजी करत होतो. मला स्वतःला सिद्ध करावे लागेल, असे माझ्या मनात नव्हते. मी चांगली कामगिरी करत आहे आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास देखील दुणावला आहे. मी सामन्याचा फारसा विचार केला नव्हता मात्र,  विकेट घेतल्याचा मला आनंद आहे.” आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus after doing wonders against australia akshar patel said was disappointed to be out of the world cup due to injury avw