Border Gavaskar Trophy Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले आहे. तिसरा सामना बुधवार पासून इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ इंदोरमध्ये दाखल झाली आहे. तिसऱ्या सामन्यापूर्वी अष्टपैलू अक्षर पटेल आणि त्याच्या पत्नीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शन घेताना दिसत आहे.
भारतीय क्रिकेटपटू अक्षर पटेल सोमवारी उज्जैनच्या महाकाल मंदिरात पोहोचला. त्याने पत्नी मेहा पटेलसोबत भस्म आरतीला हजेरी लावली, पुजाऱ्याने त्यांच्यासाठी जलाभिषेक केला. दर्शनानंतर अक्षर पटेल म्हणाला की, त्यांची गेल्या पाच वर्षांची इच्छा पूर्ण झाली आहे.
अक्षर पटेल रविवारी राहुल द्रविडसोबत इंदूरला पोहोचला होता. अक्षरची पत्नी मेहाही त्यांच्यासोबत पोहोचली आहे. केवळ अक्षरच नाही तर टीम इंडियाच्या बहुतांश खेळाडूंच्या पत्नी इंदूरमध्ये आहेत. रविवारी केएल राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टीही महाकाल मंदिरात पोहोचले होते. जिथे ते भस्म आरतीमध्येही सहभागी झाले होते.
सोमवारी अक्षर आणि त्याची पत्नी मेहा पटेल यांनी भस्म आरतीला हजेरी लावली. त्यानंतर अक्षरने सांगितले की, तो २०१६ मध्ये येथे (महाकाल मंदिर उज्जैन) देखील आला होता. परंतु त्यावेळी भस्म आरतीला उपस्थित राहू शकला नाही. लग्नानंतर मी भोले बाबांच्या दर्शनाला आलो, भस्म आरतीत सहभागी झालो, माझी अनेक वर्षांची इच्छा पूर्ण झाली.
अक्षर पटेलने महिनाभरापूर्वी (२६ जानेवारी) मेहाशी लग्न केले. दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते, दोघांनी जानेवारी २०२२ मध्ये एंगेजमेंट केली होती. मेहा पटेल सध्या तिच्या पतीसोबत इंदूरमध्ये आहे, जिथे १ मार्चपासून तिसरी कसोटी खेळली जाणार आहे. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली आहे. तिसरी कसोटी अनिर्णित राहिली तरी भारत मालिकेत अभेद्य आघाडी घेईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.