Nitish Reddy Century: मेलबर्न कसोटीत नितीश रेड्डी भारतासाठी तारणहार ठरला. त्याने भारत-ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले. नितीश रेड्डीच्या शतकाचं सर्वच जण कौतुक करत आहेत. नितीश रेड्डीचे शतक पूर्ण होताच त्याच्या वडिलांच्या आणि कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, इतकंच नव्हे तर त्याचं शतक पाहून माजी खेळाडू रवी शास्त्री यांचेही डोळे पाणावले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नितीश रेड्डी देशांतर्गत क्रिकेट आंध्रप्रदेश संघाकडून खेळतो. नितीश रेड्डीने मेलबर्न कसोटीत शतक झळकावत भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. नितीश रेड्डीने शतकी खेळीत या १० चौकार आणि एक षटकार लगावला. त्याच्या खेळीनंतर आंध्र क्रिकेट असोसिएशनचे (एसीए) अध्यक्ष आणि विजयवाड्याचे खासदार केसिनेनी शिवनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे.

हेही वाचा – IND vs AUS: जसप्रीत बुमराहने सॅम कॉन्स्टसचा त्रिफळा उडवला, क्लीन बोल्ड करताच केलं भन्नाट सेलिब्रेशन; असा घेतला बदला… पाहा VIDEO

आंध्र क्रिकेट असोसिएशन (एसीए) चे अध्यक्ष आणि विजयवाडाचे खासदार केसिनेनी शिवनाथ यांनी युवा क्रिकेटपटू नितीश कुमार रेड्डी याला २५ लाखांचे रोख बक्षीस जाहीर केले. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीतील चमकदार कामगिरीबद्दल त्यांनी नितीश रेड्डीचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की नितीशला लवकरच मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हा ही बक्षिसाची रक्कम सुपूर्द करतील.

हेही वाचा – IND vs AUS: सिराजच्या विकेटवरून मोठा ड्रामा, कमिन्सने तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर घेतला रिव्ह्यू; मैदानावरील पंचांनी पाहा काय केलं?

यावेळी ते म्हणाले की, नितीश युवा खेळाडूंसाठी आदर्श म्हणून पुढे आला आहे. क्रिकेटमधील युवा प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. याशिवाय माहिती देताना ते म्हणाले की, अमरावतीमध्ये लवकरच अत्याधुनिक स्टेडियम बांधण्यात येणार आहे. तसेच, एसीए आंध्र प्रदेशचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आयपीएल संघ तयार करण्याची शक्यता तपासली जात आहे.

हेही वाचा – WTC Final Scenario: भारताने मेलबर्न कसोटी गमावली किंवा ड्रॉ झाली तर WTC फायनलचं समीकरण कसं असेल? वाचा सविस्तर

८व्या क्रमांकावर फलंदाजी करत नितीश रेड्डीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे. यासह तो कसोटीत आठव्या क्रमांकावर शतक झळकावणारा जगातील तिसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या दोनच खेळाडूंनी ८व्या किंवा त्याखालील क्रमांकावर खेळताना शतकं झळकावली आहेत. या यादीत पहिले नाव बांगलादेशच्या अबुल हसनचे आहे, तर दुसरे नाव भारताच्या अजय रात्राचे आहे. नितीश रेड्डीने २१ वर्षे २१६ दिवस वय असताना कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.