ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराने 193 धावांची खेळी करुन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. सलग दोन दिवस खेळपट्टीवर ठाण मांडून पुजाराने भारताच्या डावाला आकार दिला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पुजाराला बाद करण्याचे हर प्रकारे प्रयत्न करुन पाहिले मात्र त्यांना यश आलं नाही. पहिल्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लॉयनने गोलंदाजीदरम्यान आगतिक होऊन पुजाराला प्रश्न विचारला, तुला कंटाळा नाही का येत? या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
lyon_chirp_edit_0 from Bob Paine on Vimeo.
अखेर दुसऱ्या दिवशी आपल्या द्विशतकापासून अवघ्या 7 धावा दूर असताना लॉयननेच पुजाराला बाद केलं. मात्र पुजारा माघारी परतल्यानंतरही ऑस्ट्रेलियाची चिंता कमी झाली नाही. यष्टीरक्षक ऋषभ पंतने दीड शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियासमोर डोंगराएवढं आव्हान उभं केलं. भारताने 7 गड्यांच्या मोबदल्यात 622 धावांवर आपला डाव घोषित केला. दुसऱ्या दिवसाअखेरस ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमावता 24 धावा केल्या आहेत.