IND vs AUS, World Cup 2023: विश्वचषक २०२३च्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केला. या विजयासह रोहित शर्माच्या संघाने विजयी सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा डाव १९९ धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघ सहज जिंकेल, असे वाटत होते, मात्र तसे झाले नाही. ऑस्ट्रेलियाने जोरदार पुनरागमन केले आणि पहिल्या दोन षटकांत दोन धावांत तीन विकेट्स गमावल्या. कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर भारतीय डावाच्या आठव्या षटकात विराट कोहलीनेही हवेत हुक शॉट खेळण्याच्या नादात चेंडू हवेत उडाला आणि मिचेल मार्शने अगदी सोपा झेल सोडला. या जीवदानाचा फायदा घेत कोहलीने ८५ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. रविचंद्रन अश्विन याने या संपूर्ण घटनेबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला की, “संपूर्ण सामन्यात मी एका जागी उभा होतो आणि टीम इंडियाच्या विजयानंतरच तो तिथून हललो.”

दोन धावांत तीन विकेट पडल्यानंतर अश्विनचे ​​वक्तव्य

सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्स अधिकृत ब्रॉडकास्टरशी बोलताना अश्विनने दोन धावांवर तीन विकेट्स पडल्यानंतरची परिस्थिती स्पष्ट केली आणि म्हणाला, “जेव्हा मी पाहिले की विराट कोहलीने मारलेला चेंडू हवेत गेला तेव्हा मी अक्षरशः ड्रेसिंग रूममधून बाहेर पळत आलो. मात्र, नशिबाने त्याचा झेल सुटला नाहीतर मला त्यावेळी आता सगळं संपले असे वाटत होते. त्याच विचारात मला माझे सहकारी तिथून उठून बाहेर जा असे सांगत होते. मात्र, मी तिथेच एका जागी उभा होतो.”

अश्विन पुढे म्हणाला, “हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विश्वचषक सामना आहे त्यामुळे तुम्ही काहीही सोपे होईल अशी अपेक्षा करू शकत नाही. हा एक मोठा सामना होता आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या संघाला १९९ धावांवर बाद करता तेव्हा तुम्हाला वाटते की आम्ही सहज जिंकू? पण तसे होत नाही. मी पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये पळत गेलो आणि एकाच जागी शांतपणे सामना संपेपर्यंत उभा होतो. मग गर्दीचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. संपूर्ण सामन्यादरम्यान मी एका जागी उभा असल्याने माझे पाय आता दुखायला लागले आहेत.” असे मिश्कील टिपण्णी करत तो तिथून गेला.

हेही वाचा: IND vs AUS, World Cup: ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ निर्णयामुळे सचिन तेंडुलकर झाला आश्चर्यचकित, सामना संपल्यानंतर संघातील चुकांवर केलं भाष्य

खेळपट्टीबाबत अश्विनचे ​​मोठे भाष्य

जीवदान मिळाल्यानंतर कोहलीने केएल राहुलसह चौथ्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी केली आणि भारताचा विजय जवळपास निश्चित केला. हार्दिक आणि राहुल यांनी योग्य कार्य पूर्ण केले आहे. राहुलने षटकार मारून सामना संपवला. ९७ धावा करून तो नाबाद राहिला. खेळपट्टीबद्दल बोलताना अश्विन म्हणाला, “मी चेन्नईमध्ये खूप क्रिकेट खेळलो आहे. चेन्नईच्या नेहमीच्या खेळपट्टीपेक्षा ती पूर्णपणे वेगळी आहे, ज्यामध्ये खूप तडे आहेत. दुसऱ्या डावात हेझलवूड आणि ऑस्ट्रेलियन संघाने कशी गोलंदाजी केली ते तुम्ही पाहिले. खरं तर परिणाम काय होईल याची आम्हाला थोडी काळजी वाटत होती. इथले लोक नेहमीच आपल्या देशाचे समर्थन करतात. आम्ही नाणेफेक गमावली हे चांगले झाले आणि गोलंदाजी घेतल्यानंतर रवींद्र जडेजाने जबरदस्त गोलंदाजी केली.”

हेही वाचा: World Cup 2023: राशिद खानने दाखवले मोठे मन, वर्ल्डकप सुरु असताना देशवासीयांसाठी केली खास घोषणा

संघात निवड झाल्याबद्दल अश्विन काय म्हणाला?

या खेळपट्टीशी जुळवून घेताना अश्विन म्हणाला, “येथे विशिष्ट गतीने गोलंदाजी करणे गोलंदाजांसाठी अवघड आहे. हे साइडस्पिन आणि ओव्हरस्पिन दुरुस्त करावे लागतात. दमट हवामानामुळे शरीराला योग्य स्थितीत ठेवावे लागते. या सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. मला ते लय येण्यासाठी साधारणपणे सहा ते आठ चेंडू लागतात.”

या स्पर्धेसाठी निवड झाल्यावर अश्विन म्हणाला, “माझ्यासाठी ही आश्चर्यचकित करणारी घटना आहेत. मी घरी आराम करत होतो. संघाकडून फोन आल्यानंतर मी काही क्लब गेम्स खेळलो, पण रोहित आणि राहुल (द्रविड) यांनी मला सांगितले की, काही समस्या आल्यास आम्ही तुमच्याशी संपर्क करू. मी त्याला फक्त गंमतीने म्हणालो की मला आशा आहे की तू माझ्याकडे परत येणार नाहीस. पण ते आले आणि आज मी संघाचा भाग आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus ashwin reveals on dropping virat kohlis catch said i watched the match sitting in one seat avw