* अश्विने घेतल्या पाच विकेट
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सुरू असलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव २५२ धावांत संपुष्टात आला आहे. पहिल्या दिवशीची नाबाद जोडी पीटर सिडल आणि जेम्स पॅटिन्सन. या जोडीत भंग पाडण्यात अश्विनला यश आले. अश्विनने सिडलला त्रिफळा बाद केले. सिडलने ५१ धावांची खेळी केली. अश्विनने आपल्या फिरकीच्या जादूवर ऑस्ट्रेलियन संघाच्या पाच खेळाडूंना बाद केले. आत्तापर्यंत नऊ वेळा अश्विनने  अंतराष्ट्रीय कसोटीक्रिकेटमध्ये पाच विकेट घेतले आहेत. तर सिडलने त्याच्या करिअरमधील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. परंतु अश्विनच्या भेदक गोलंदाजीमुळे सिडल त्रिफळाबाद झाला.  

Story img Loader