IND vs AUS Australia All Out on 104 Runs: भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाने त्यांच्या घरच्या मैदानावर फलंदाजी करण्यात अपयशी ठरले. मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाचा डाव उचलून धरला खरा पण संघाला आघाडी मिळवून देऊ शकला नाही आणि परिणामी ऑस्ट्रेलिया संघ पर्थच्या बालेकिल्ल्यात १०४ धावांवर सर्वबाद झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत टीम इंडियाने ४६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. पर्थ कसोटीत भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला तो स्वतः कर्णधार जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया ऑल आऊट झाल्यानंतर भारताकडे किती धावांची आघाडी?

पर्थमध्ये टीम इंडियाला आघाडी मिळाली पण ४५ वर्ष जुना रेकॉर्ड तुटण्यापासून वाचला. पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाने ७९ धावांत ९ विकेट गमावल्या आणि टीम इंडिया कसोटीतील सर्वात कमी धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाला ऑलआउट करण्याचा ४५ वर्ष जुना विक्रम मोडेल असे वाटत होते. पण ऑस्ट्रेलियाची शेवटची जोडी या मार्गात अडथळा ठरली. ऑस्ट्रेलिया संघ १०४ धावांवर सर्वबाद झाला यासह ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाविरूद्ध पहिल्या डावात उभारलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे तर भारताविरूद्ध ही ऑस्ट्रेलियाची चौथी सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी १९४७ च्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्ध पहिल्या डावात १०७ धावा केल्या होत्या.

IND vs AUS ICC BCCI and Indian Cricket Team in One Word Australian Cricket Answer Watch Video
VIDEO: ICC पेक्षा BCCI वरचढ? ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दिली भन्नाट उत्तरं, हेड-स्मिथच्या उत्तराने वेधलं लक्ष
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
West Indies defeated by Indian women team sports news
भारतीय महिला संघाकडून विंडीजचा धुव्वा
IND vs AUS Australia Declared Innings on 89 Gives 275 Runs Target to India in 54 Overs in Gabba Test
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा माईंड गेम, झटपट धावा करत भारताला विजयासाठी दिलं इतक्या धावांचं लक्ष्य
IND vs AUS Big Blow to Australia as Josh Hazlewood Suffers Calf Injury went Hospital for Scans Gabba Test
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला गाबा कसोटीत मोठा धक्का, ‘या’ गोलंदाजाला नेलं हॉस्पिटलमध्ये; एक षटक टाकताच गेला होता मैदानाबाहेर
IND vs AUS Isa Guha Racial Comment on Jasprit Bumrah During Gabba Test Called him primates
IND vs AUS: पुन्हा मंकीगेट प्रकरण? जसप्रीत बुमराहवर महिला कमेंटेटरने केली वर्णभेदात्मक टिप्पणी, गाबा कसोटीत नव्या वादाला फुटलं तोंड
IND vs AUS Australia all out on 445 runs
हेड-स्मिथच्या शतकाने भारताला गाबा कसोटीत टाकलं बॅकफूटवर, ऑस्ट्रेलियाने पहिल्याच डावात उभारला धावांचा डोंगर
Travis Head is the first batter in Test Cricket to bag a King Pair & century at a venue in the same calendar year
IND vs AUS: ट्रॅव्हिस हेडचा गाबा कसोटीत मोठा विक्रम, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं

हेही वाचा – IND vs AUS: जसप्रीत बुमराहचा पर्थ कसोटीत दुर्मिळ विक्रम, कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील दुसरा तर भारताचा पहिला गोलंदाज

ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्ध उभारलेली सर्वात कमी धावसंख्या (Australia’s lowest scores in Tests against India)

८३/१० – मेलबर्न १९८१
९१/१० – नागपूर २०२३
९३/१० – वानखेडे २००४
१०४/१० – पर्थ २०२४
१०५/ १० – कानपूर १९५९
१७७/१० सिडनी १९४७

हेही वाचा – IND vs AUS: सिराज आणि लबुशेन भर मैदानात एकमेकांशी भिडले, लबुशेनची कृती पाहून विराटही संतापला अन्… VIDEO व्हायरल

ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क-हेझलवूडची मोठी भागीदारी

मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड या शेवटच्या जोडीने सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठी भागीदारी केली. या दोघांनी ११० चेंडूंचा सामना करत २५ धावांची भर घातली, जी ऑस्ट्रेलियाच्या पर्थ कसोटीतील पहिल्या डावातील कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी होती. याआधी सलामीच्या जोडीने १४ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – IND vs AUS: “हा विकेट नियमानुसार…”, केएल राहुलच्या वादग्रस्त विकेटवर मिचेल स्टार्कचं मोठं वक्तव्य; नियमाचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाला?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. यादरम्यान जसप्रीत बुमराहने पाच विकेट घेतल्या आणि तो भारताच्या या ऐतिहासिक पुनरागमनामध्ये त्याने मोठी भूमिका बजावली. बुमराहने १८ षटकांमध्ये ५ विकेट्स घेत ३० धावा दिल्या. बुमराहशिवाय हर्षित राणाने तीन आणि मोहम्मद सिराजने २ विकेट घेतले. हर्षित राणाचा हा पदार्पणाचा सामना होता. भारतासाठी गेल्या काही सामन्यांमध्ये मालिकांमध्ये कर्दनकाळ ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड करत पहिली आंतरराष्ट्रीय विकेट मिळवली. या तीन गोलंदाजांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला इतक्या कमी धावसंख्येपर्यंत रोखण्यात टीम इंडियाला यश आले.

Story img Loader