IND vs AUS 4th Test Day 4 Updates in Marathi: ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत धावांचा डोंगर उभारला आहे. कांगारू संघाने टॉप ऑर्डर फलंदाजांच्या जोरावर ४७४ धावांची मोठी धावसंख्या उभारली. मेलबर्न कसोटीत ट्रॅव्हिस हेड शून्यावर बाद झाला पण ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक खेळाडूने धावांचे योगदान देत भारतीय गोलंदाजांचं कंबरड मोडलं. भारतीय संघाने १२२ षटकं गोलंदाजी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडला. ऑस्ट्रेलियाचा पदार्पण करणारा नवा सलामीवीर सॅम कोन्स्टासने बेधडक सुरूवात करत उस्मान ख्वाजाच्या जोडीने संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचण्यात मदत केली. सॅम कोन्स्टासने ६० धावा, उस्मान ख्वाजाने ५७ धावा, मार्नस लबुशेनने ७२ धावा तर स्टिव्ह स्मिथने शतकी खेळी करत १४० धावांची जबरदस्त कामगिरी केली. यासह ऑस्ट्रेलियाने वरच्या फळीतील फलंदाजांच्या जोरावर ३५० धावा केल्या, याशिवाय कर्णधार पॅट कमिन्सने ४९ धावांची खेळी खेळत आकडा ४५० पार नेण्यात मोठी भूमिका बजावली.

हेही वाचा – IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात नेमकं काय घडलं? उस्मान ख्वाजाने सांगितला प्रसंग

भारताच्या गोलंदाजी युनिटने देखील फार निराशा केली. जसप्रीत बुमराहने २८.४ षटकांमध्ये ९९ धावा देत ४ विकेट्स घेतले. बुमराहशिवाय इतर कोणत्याच गोलंदाजांने धावांवर अंकुश ठेवण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. मोहम्मद सिराजने एकही विकेट न घेता १२२ धावा दिल्या. तर आकाशदिपने ९४ धावा देत २ विकेट्स घेतले. तर रवींद्र जडेजाने २३ षटकांत ७८ धावा देत ३ विकेट्स आणि वॉशिंग्टने १ विकेट घेतली. तर नितीश रेड्डीने ७ षटकांत २१ धावा दिल्या. भारतीय संघ पुन्हा एकदा पूर्णपणे बुमराहवर अवलंबून असल्याचे दिसले. बुमराहने या सामन्यात सर्वाधिक षटकं गोलंदाजी केली.

हेही वाचा – IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO

भारतीय संघाला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान कायम ठेवायचे असेल तर हा सामना जिंकणं महत्त्वाचं असणार आहे. त्यासाठी फलंदाजांना या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत धावा करणं महत्त्वपूर्ण असणार आहे.

U