IND vs AUS 3rd Test Updates in Marathi: भारत- ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी अत्यंत रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ८९ धावा करत डाव घोषित केला आहे. यासह भारताला ५४ षटकांत २७५ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. चौथ्या दिवसापर्यंत हा सामना ड्रॉ होण्याची शक्यता दिसत होती. पण आता हा सामना दोन्हीपैकी कोणतरी एक संघ जिंकेल असे चित्र दिसत आहे. ऑस्ट्रेलियाने रणनिती आखत झटपट धावा करत भारताला फलंदाजीसाठी बोलावलं आहे.

पाऊस आणि हवामान भारताच्या डावात आणणार अडथळा

भारताला मिळालेलं २७५ धावांचं लक्ष्य पाहता गाबा कसोटी जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न टीम इंडियाची फलंदाजी करणार आहे. पण यामध्ये पाऊस व्यत्यय आणणार आहे. ऑस्ट्रेलियाला माहित आहे की संध्याकाळी पावसाची शक्यता जास्त आहे. हवामान खात्यानुसार ८०-९०% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे सामना पूर्ण होणार नाही, अशी शक्यता दिसत आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला हे देखील माहित आहे की ढगाळ वातावरणात २७५ धावांचे लक्ष्य ५०० धावांसारखे असणार आहे.

India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Australia Beat India by 10 Wickets in Pink Ball Test Pat Cummins 5 Wickets Nitish Reddy 42 Runs Inning
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतावर १० विकेट्सनी दणदणीत विजय
IND vs AUS 2nd Test Day 2 Highlights Only Twice Any Team Win Day Night Test After Conceding First Innings Lead
IND vs AUS: ॲडलेड कसोटीत भारताची स्थिती बिकट, दुसऱ्या दिवशी निम्मा संघ तंबूत; ‘हा’ रेकॉर्ड पाहता पराभव टाळणं कठीण
IND vs AUS Controversial Umpiring Over R Ashwin LBW Appeal as Mitchell Marsh Given Out KL Rahul DRS b
IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?
IND vs AUS: Adelaide floodlight failure forces stoppage in play twice
IND vs AUS: ऑस्ट्रेलियात लोडशेडिंग! अ‍ॅडलेडमध्ये २ वेळा बंद झाले फ्लडलाईट्स, हर्षित राणा वैतागला तर चाहत्यांनी… पाहा VIDEO
IND vs AUS India All Out on 180 Runs in 2nd Test Mitchell Starc 6 Wickets Nitish Reddy Adelaide
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीच्या पहिल्या अवघ्या ५ तासांत टीम इंडिया ऑल आऊट, एकट्या स्टार्कचे ६ बळी
IND vs AUS Why are Australian players wearing black armbands in Adelaide Test
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरूद्ध दुसऱ्या कसोटीत हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? काय आहे कारण?

हेही वाचा – IND vs AUS: “सॉरी सॉरी…”, आकाशदीपने आधी हेडला खाली वाकून उचलायला लावला चेंडू, मग मागितली माफी; पाहा VIDEO

पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी बुधवारी पहिल्या सत्रात केवळ २४ चेंडू टाकता आले, त्यामुळे सामना ड्रॉ होईल असे दिसत होते. गाबा येथे भारताचा पहिला डाव २६० धावांवर आटोपल्याने, खराब हवामानाचा इशारा डिजिटल स्कोअरबोर्डवर दर्शविण्यात आला होता. भारताचा डाव संपल्यानंतर, खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये राहण्यास सांगण्यात आले तर चाहत्यांना पावसापासून बचाव करण्यासाठी सीमारेषेपासून दूर जागा घेण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मुसळधार पावसामुळे खेळ बराच वेळ थांबला होता.

हेही वाचा – IND vs AUS: बुमराह-आकाशदीपची ऐतिहासिक भागीदारी, ७७ वर्षांत ऑस्ट्रेलियाविरूद्ध अशी कामगिरी करणारी पहिलीच जोडी

भारताच्या गोलंदाजांची उत्कृष्ट गोलंदाजी, पाचव्या दिवशी केलं जबरदस्त पुनरागमन

गाबा कसोटीत पहिले ४ दिवस बॅकफूटवर राहिल्यानंतर ५व्या दिवशी भारतीय संघाने अप्रतिम पुनरागमन केले. भारताच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत यजमान संघाच्या फलंदाजांची झोप उडवली. झटपट धावा करून डाव घोषित करण्याचा निर्धार करून ऑस्ट्रेलियाचे फलंदाज मोठमोठे फटके खेळू पाहत होते पण भारताच्या गोलंदाजांनी त्यांच्यावर वचक बसवला. ३३ धावांत ऑस्ट्रेलियाने तब्बल ८९ धावांची भर घातली.

जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. बुमराहने ३ विकेट घेतले आणि उस्मान ख्वाजाला ८ धावांवर डावाची पहिली विकेट घेतली. यानंतर विकेट्सची झुंबड उडाली. सिराज आणि आकाश दीपने प्रत्येकी २ विकेट घेतले.

हेही वाचा – IND vs AUS: आकाशदीपचा गगनचुंबी षटकाराने खुद्द विराटला केलं चकित, भन्नाट प्रतिक्रिया देत कोहलीने ड्रेसिंग रूममध्ये मारली उडी; VIDEO व्हायरल

पाऊन आणि खराब हवामान यांनी गाबा कसोटीत मोठा अडथळा आणला आणि पाचपैकी तीन दिवस संपूर्ण षटकांचा सामना होऊ शकला नाही. फक्त दुसऱ्या दिवशीच खेळ पूर्ण होऊ शकला. सामन्याचा निकाल काहीही लागला तरी, भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी चिंतेचे कारण बनली आहे आणि मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी यात सुधारणा करणं आवश्यक आहे.

हेही वाचा – New Zealand New Captain: न्यूझीलंड संघाला मिळाला केन विल्यमसनचा उत्तराधिकारी, वनडे आणि टी-२० साठी नव्या कर्णधाराची घोषणा

केएल राहुल वगळता सर्व भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन वेगवान आक्रमणाचा सामना करण्यात अपयशी ठरले आहेत. कर्णधार रोहित शर्मा खराब फॉर्ममध्ये आहे आणि पर्थमध्ये शतक झळकावण्याव्यतिरिक्त, रनमशील विराट कोहली ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू खेळताना बाद होत आहे. भारताला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर सर्व फलंदाजांनी योगदान देणं महत्त्वपूर्ण असणार आहे.

Story img Loader