त
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
IND vs AUS 1st Test Australia embarrassing record at home : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला पर्थ येथील सामन्यान सुरुवात झाली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणारा भारतीय संघ ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यापुढे १५० धावांवर गारद झाला. यानंतर भारतीय गोलंदाजांनी जशात तसे उत्तर दिले, ज्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या दिवसांचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात सात गडी गमावून ६७ धावा करु शकला. यासह कांगारु संघाच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा अॅलेक्स कॅरी (१९) आणि मिचेल स्टार्क (६) धावांवर परतले. ऑस्ट्रेलियन संघ भारताच्या तुलनेत अजून अजूनही ८३ धावांनी मागे आहे. आतापर्यंत एकाही कांगारू फलंदाजाला २० च्या वर जाता आलेले नाही. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार विकेट् घेतल्या आहेत. त्याचबरोबर मोहम्मद सिराजने २ आणि पदार्पणवीर हर्षित राणाने एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाने ४४ वर्षांनंतर केला लाजिरावाणाा विक्रम –
जर आकडेवारीबद्दल बोलायचे तर, १९८० नंतर ऑस्ट्रेलियन संघासोबत असे घडण्याची ही दुसरी वेळ आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियाने मायदेशात कसोटी खेळताना ४० धावांचा आकडा गाठण्यापूर्वी ५ विकेट्स गमावल्या आहेत. यापूर्वी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेनेही अशीच कामगिरी केली होती. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर पूर्णपणे शरणागती पत्करली होती. त्यावेळी होबार्टमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने केवळ १७ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. भारतासमोर ऑस्ट्रेलियाने ३८ धावांत ५ विकेट्स गमावल्या आहेत. दरम्यान, संघाची धावसंख्या ५० धावांपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांची सहावी विकेट्सही गेली होती.
हेही वाचा – Harshit Rana : हर्षित राणाची पदार्पणातच कमाल! भारतासाठी सतत कर्दनकाळ ठरणाऱ्या ट्रॅव्हिस हेडचा उडवला त्रिफळा
u
बुमराहने पहिल्याच षटकापासून केले आक्रमण –
टीम इंडियाच्या गोलंदाजी सुरूवात होताच, जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरला खिंडार पाडली. त्याने पहिल्या तीन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला मोठा धक्का दिला. त्यात स्टीव्ह स्मिथला गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचाही समावेश होता. मोहम्मद सिराजला दुसऱ्या टोकाकडून चांगली गोलंदाजी करता आली नाही, त्यामुळे कर्णधाराने हर्षित राणाकडे गोलंदाजी सोपवली. त्याने ट्रॅव्हिस हेडला बाद करून भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले. यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये सिराज पुन्हा आला, तेव्हा त्याने टिच्चून मारा करताना दोन महत्त्वा्या विकेट्स घेत ऑस्ट्रेलियन संघाला बॅकफूटवर ढकलले.