India vs Australia 4th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेतील चौथा कसोटी सामना गुरुवारपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा शेवटचा सामना असणार आहे. या मालिकेत आता भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियापेक्षा २-१ ने पुढे आहे. शेवटच्या आणि चौथ्या कसोटी सामन्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासह कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेकीला उपस्थिती लावली आणि खेळाडूंशी भेटी-गाठी घेऊन चर्चा केली. दोन्ही देशांचे पंतप्रधान सजवलेल्या गोल्फ गाड्याच्या रथात बसून त्यांनी मैदानाचा फेरफटका मारला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात हे क्रिकेटचे ७५वे वर्ष आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. नाणेफेकीचा निकाल ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात पडला असून स्टीव्ह स्मिथ याने फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
रवी शास्त्री यांनी क्रिकेटचा इतिहास दोन्ही नेत्यांना सांगितला
नाणेफेकीनंतर रवी शास्त्री पीएम मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीजसोबत स्टेडियमच्या गॅलरीत पोहोचले. भारतीय क्रिकेटशी संबंधित अनेक खास क्षण येथे जतन करण्यात आले आहेत. रवी शास्त्री यांनी दोन्ही नेत्यांना त्यांच्याबद्दल सांगितले. यावेळी रवी शास्त्री यांनी दोन्ही नेत्यांना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऐतिहासिक सामन्यांची माहिती दिली. दोन्ही देशांमधील क्रिकेट सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे फोटोही येथे लावण्यात आले आहेत.
BCCI अध्यक्षांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना दिली खास भेट
पहिल्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी, BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना दोन्ही देशांमधील ७५ वर्षांच्या क्रिकेट संबंधांचे चित्रण करणारी एक विशेष कलाकृती भेट दिली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विशेष कलाकृती सादर केली. यामध्ये दोन्ही देशांमधील ७५ वर्षांचे क्रिकेट संबंध जपले गेले आहेत. राष्ट्रगीत सुरू असतानाही दोन्ही देशांचे पंतप्रधान आपापल्या संघातील खेळाडूंसोबत होते. पंतप्रधान मोदी टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत उभे राहून राष्ट्रगीत गाताना दिसले. त्याचवेळी राष्ट्रगीत सुरू असताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज ऑसी खेळाडूंसोबत उभे राहिले.
एएनआयच्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, नाणेफेक सकाळी ९ वाजता झाली, तर सामना सकाळी ९.३० वाजता सुरू झाला. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही नेते साइटच्या स्क्रीनसमोर बसले होते. असे सांगितले जात आहे की दोन्ही पंतप्रधान येथे सुमारे २ तास म्हणजे १० ते १०.३० पर्यंत थांबू शकतात. स्टेडियममधून बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान मोदी थेट राजभवनात जातील. तेथून दुपारी २ वाजता दिल्लीला रवाना होतील.