नागपुरात भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघ नाराज आहे. दुखापतीने त्रस्त कांगारू संघाने नव्या डावखुऱ्या फिरकीपटूला बोलावले आहे. मॅथ्यू कुह्नेमन लवकरच संघात सामील होणार आहे. त्याचवेळी लेगस्पिनर मिचेल स्वेपसनला संघातून वगळण्यात आले. तो पिता होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची दुसरी कसोटी १७ फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ऑस्ट्रेलियन संघाचा नागपुरात तीन दिवसांत पराभव झाला. त्याला भारतीय फिरकीपटूंचा सामना करता आला नाही. दुसऱ्या डावात एकही सत्र खेळता आले नाही. मालिकेतील पुढील तीन कसोटी सामन्यांमध्येही ऑस्ट्रेलियाला टर्निंग ट्रॅक मिळण्याची अपेक्षा आहे. अशा स्थितीत त्याने डावखुरा फिरकी गोलंदाज मॅथ्यू कुहनेमनला संघात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. तो ऑस्ट्रेलियाकडून चार एकदिवसीय सामने खेळला आहे. यादरम्यान त्याने सहा विकेट्स घेतल्या आहेत.
कुहनेमनचा विक्रम
मॅथ्यू कुह्नेमनच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने १३ सामन्यामध्ये ३५ गडी बाद केले आहेत. २६ वर्षीय फिरकी गोलंदाज क्वीन्सलँडकडून खेळतो. तो बिग बॅशमध्ये ब्रिस्बेन हीटचे प्रतिनिधित्व करतो. ऑस्ट्रेलियन संघात आधीच डावखुरा फिरकीपटू अॅश्टन अगर आहे. आगरही अनुभवी आहे पण त्याचा अलीकडचा फॉर्म खराब राहिला आहे. या कारणास्तव ऑस्ट्रेलियाला कुहनेमनला बोलावावे लागले.
काय म्हणाले क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्ड?
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “स्वीपसनला पहिल्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही. तो आता त्याची गर्भवती पत्नी जेससोबत ब्रिस्बेनला परतणार आहे. डावखुरा फिरकीपटू अॅश्टन अगरचीही नागपूर कसोटीत अंतिम अकरामध्ये निवड झाली नाही. कुह्नेमन लवकरच दुसऱ्या कसोटीआधी दिल्लीला पोहोचल. तो दुसऱ्या कसोटीत नॅथन लियॉन आणि टॉड मर्फीसोबत खेळू शकतो.
हेजलवूडसाठी दिल्लीत खेळणे अवघड आहे
नागपूर कसोटीतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, “वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला दिल्लीत खेळणे कठीण आहे. तो दुसऱ्या कसोटीतूनही बाहेर राहू शकतो. मिचेल स्टार्क आणि कॅमेरून ग्रीनचा निर्णय सामन्यापूर्वी होऊ शकतो. मात्र हा निर्णय सर्वस्वी संघ व्यवस्थापनावर अवलंबून आहे.” पहिल्या कसोटीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया दिल्ली काबीज करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. अशात ऑस्ट्रेलियाने आणखी एका फिरकीपटूला आपल्या ताफ्यात सामील केले आहे. डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू कुह्नेमन हा पुढील काही दिवसात संघासोबत जोडला जाईल.