India Vs Australia ODI Series: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर खेळली जात आहे. या मालिकेतील चार सामन्यांपैकी दोन सामने अजून खेळले जाणे बाकी आहे. अशात एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला आहे. ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श आणि झाय रिचर्डसन या संघात परतले आहेत. हे खेळाडू एकदिवसीय विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या बहुप्रतिक्षित वनडे दौऱ्यासाठी दुखापतीतून पुनरागमन करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनडे मालिका १७ मार्चपासून सुरू होणार –

गुरुवारी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेसाठी १६ खेळाडूंचा संघ जाहीर केला. ही मालिका १७ मार्चपासून सुरू होणार आहे. मॅक्सवेलला पाय आणि मार्शला घोट्याच्या दुखापतीमुळे संपूर्ण बिग बॅश लीगला मुकावे लागले होते. तर रिचर्डसनला हॅमस्ट्रिंगच्या ताणामुळे ब्रिस्बेन हीटविरुद्धच्या पर्थ स्कॉचर्सच्या फायनलमधून बाहेर पडावे लागले होते.

विश्वचषकाची तयारी करणारा संघ –

निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी एका निवेदनात म्हटले, “विश्वचषक स्पर्धेला सात महिने बाकी असताना, भारतातील हे सामने आमच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ग्लेन, मिशेल आणि झाय हे सर्व महत्त्वाचे खेळाडू आहेत. आम्हाला वाटते की हा संघ ऑक्टोबरमध्ये दिसू शकतो.” यष्टिरक्षक जोश इंग्लिस आणि वेगवान गोलंदाज शॉन अॅबॉटसह अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस आणि कॅमेरॉन ग्रीन यांना वनडे संघात स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा – Umesh Yadav: भारतीय गोलंदाजावर कोसळला दु:खाचा डोंगर; कुटुंबातील ‘या’ प्रमुख व्यक्तीचे झाले निधन

अॅश्टन अगरचाही समावेश –

कसोटी संघातून वगळल्यानंतरही पश्चिम ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅश्टन अगरचा संघात समावेश करण्यात आला आहे. पुढच्या महिन्यात भारतात परतण्यापूर्वी आगर पश्चिम ऑस्ट्रेलियासाठी काही देशांतर्गत क्रिकेट खेळणार आहे. दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा वनडे गोलंदाज जोश हेझलवूड मर्यादीत षटकांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. तो रिहॅबमध्ये आहे.

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ –

पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा

हेही वाचा – IPL 2023: सनरायझर्स हैदराबादचा मोठा निर्णय; कर्णधारपदी ‘या’ धडाकेबाज खेळाडूची केली निवड

वनडे मालिकेचे वेळापत्रक –

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १७ मार्चपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू होणार आहे. यानंतर दुसरा सामना १९ मार्चला आणि तिसरा सामना २२ मार्चला होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus australias 16 member squad announced for the odi series against india vbm