भारतीय संघ २१ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताकडून रोहित शर्माचे कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. लयीत असलेला रोहित शर्मा संघात आल्याने भारताची ताकद वाढली आहे. मात्र ऑस्ट्रेलियाच्या संघात कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर या दोघांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यांच्यावर असलेली बंदी भारताविरुद्धच्या मालिकेआधी उठवण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण तसे अद्याप झालेले दिसत नाही. त्यातच ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मिचेल जॉन्सन याने या खेळाडूंवरील बंदी उठवू नये, असे वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मिचेल जॉन्सन, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर</strong>

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी स्मिथ, वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट या तीन खेळाडूंवर ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने बंदी घातली. स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची तर बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली. क्रिकेट ऑस्टेलियाने केलेल्या कारवाईला कोणत्याही खेळाडूने आव्हान दिलेले नाही, त्यामुळे त्यांच्यावरील बंदी उठवू नये, असे मत जॉन्सनने व्यक्त केले आहे.

माझ्या माहितीनुसार ३ खेळाडूंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. जर स्मिथ आणि वॉर्नर या दोघांवर असलेली बंदी लवकर उठवण्यात येणार असेल, तर तीच पद्धत बॅनक्रॉफ्टबद्दल पण लागू होणार का?, असा सवाल करत तो म्हणाला की या तिघांवर चेंडू कुरतडल्याचा गंभीर आरोप होता. या तिघांनी आपल्यावरील आरोप मेनी केले, त्यानंतरच त्यांच्यावर कारवाई झाली. या कारवाईबाबत त्यांनी कोणतीही विचारणा किंवा आव्हान दिलेले नसून ती शिक्षा मेनी केली आहे. अशा परिस्तिथीत त्यांच्यावरील बंदी उठवणे योग्य नाही, असे तो म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus bans against steve smith david warner should stay says mitchell johnson