Michael Clarke Viral Video: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कवर गर्लफ्रेंड जेड यारब्रोने फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मायकेल क्लार्क त्याची गर्लफ्रेंड जेड यारब्रोसोबत भांडताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मायकल क्लार्क शर्टलेस दिसत आहे. मात्र, माजी कांगारू कर्णधाराने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

अलीकडेच, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याची गर्लफ्रेंड जेड यारब्रो कॅमेरासमोर दिग्गज क्रिकेटरला मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर येताच क्लार्कची लाखोंची नुकसान होणार आहे. ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, मायकेल क्लार्कला आगामी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेच्या कॉमेंट्री पॅनलमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेच्या समालोचनासाठी मायकेल क्लार्कवर स्वाक्षरी केली आहे.

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
shashank ketkar slam on bmc of the issue of cleanliness watch video
Video: “जर BMC आणि कचरा टाकणारी जनता निर्लज्ज…”, अस्वच्छेवरून शशांक केतकर पुन्हा संतापला; म्हणाला, “आता खपवून घेणार नाही…”

मायकेल क्लार्कवर बीसीसीआयची कारवाई?

मात्र, बीसीसीआय मायकल क्लार्कवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. वास्तविक, मायकेल क्लार्क भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी समालोचन पॅनेलचा भाग होता, परंतु असे मानले जाते की या वादानंतर माजी कर्णधाराची पॅनेलमधून हकालपट्टी जवळपास निश्चित झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीसीसीआय कारवाईच्या तयारीत आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी समालोचन पॅनलमधून काढून टाकणे हा मायकेल क्लार्कसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी ९ फेब्रुवारीपासून

बॉर्डर- गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ भारतात येत आहे. दोन्ही संघांमध्ये 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ९ फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या मालिकेसाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. या मालिकेतून भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे तिकीट मिळणार आहे. या मालिकेत चांगली कामगिरी करून टीम इंडिया जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकते.

हेही वाचा: IND vs NZ 2nd ODI: बॅटिंग की बॉलिंग? भारताने टॉस जिंकला मात्र २० सेंकदासाठी रोहित विसरलाच… Video व्हायरल

क्लार्कला मारहाण करण्याचे कारण म्हणजे प्रेमातील फसवणूक

व्हिडिओमध्ये मायकेल क्लार्कला त्याच्या गर्लफ्रेंडने चापट आणि मुक्का मारताना पाहिले आहे. प्रेमातील फसवणूक हे क्लार्क आणि त्याची प्रेयसी यांच्यातील रस्त्यावरील या हायव्होल्टेज ड्रामाचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. क्लार्कच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. यानंतरच रस्त्यात दोघांमध्ये हाणामारी झाली.

Story img Loader