भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत अनोख्या कामगिरीची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार अरोन फिंचला तिन्ही वन-डे सामन्यांमध्ये बाद करण्याचा पराक्रम साधत भुवनेश्वर कुमारने अनोखी हॅटट्रीक साजरी केली आहे. सिडनी वन-डे सामन्यात भुवनेश्वरने फिंचचा अवघ्या 6 धावांवर त्रिफळा उडवला होता, मात्र या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर दुसऱ्या सामन्यात अडलेडमध्ये भारताने दमदार पुनरागमन करत सामन्यात बाजी मारली, या सामन्यातही भुवनेश्वरने 6 धावांवर त्रिफळा उडवत फिंचला माघारी धाडलं होतं.

दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारल्यामुळे अखेरच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने चांगली सुरुवात केली खरी. मात्र 14 धावसंख्येवर असताना भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर फिंच दुसऱ्या स्लिपमध्ये झेल देऊन माघारी परतला. तिन्ही सामन्यांमध्ये फिंचला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये.

Story img Loader