करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहेत. क्रीडा क्षेत्रालाही करोनाचा फटका बसला आहे, त्यामुळे सध्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर हा डान्सचे व्हिडीओ अपलोड करून घरच्यांसोबत वेळ घालवत आहे. नुकताच वॉर्नर कतरिना कैफच्या ‘शीला की जवानी’ गाण्यावर त्याचा डान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्या व्हिडीओमध्ये तो त्याच्या लेकीसोबत नाचत होता.
“कारण तर दिलं नाही, फक्त ‘प्रयत्न कर’ असं सांगत बसले”; माजी भारतीय क्रिकेटपटूचा आरोप
‘शीला की जवानी’नंतर पुन्हा डेव्हिड वॉर्नरचा सहकुटुंब, सहपरिवार डान्स व्हिडीओ फॅन्सच्या पसंतीस उतरला. वॉर्नरने एक झकास व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओत त्याची मुलगी, त्याचं छोटं बाळ, तो स्वत: आणि वॉर्नरची पत्नी कँडी असे सारेच जण डान्स करताना दिसले. डेव्हिड वॉर्नरने काही दिवसांपूर्वीच टिकटॉक अकाऊंट सुरु केलं होतं. आपले व्हिडीओ सध्या तो तिथे पोस्ट करत होता. तेथेच त्याने आपला सहकुटुंब डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला होता आणि तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ते सारे एका झकासपैकी म्यूझिकवर डान्स करत होते. त्यानंतर आता वॉर्नर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
“धोनी स्टार झाला आणि माझ्या कामगिरीचा आलेख घसरला, पण मैत्री कायम”
यावेळी वॉर्नर चर्चेत येण्याचे कारण डान्स नसून काहीसं वेगळं आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार भुवनेश्वर कुमार आणि सध्याचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी लाइव्ह चॅटद्वारे संवाद साधला. या चॅटमध्ये वॉर्नरने भुवनेश्वर कुमारला विचारलं, “जर मेलबर्न क्रिकेट मैदानावर जर टी २० विश्वचषक २०२० ची अंतिम फेरी असेल, त्यावेळी शेवटच्या चेंडूवर जर माझ्या संघाला विजयासाठी ४ धावा हव्या असतील आणि मी फलंदाजी करत असेल व तू गोलंदाज असशील तर तू कोणत्या प्रकारचा चेंडू टाकशील?” त्यावर भुवनेश्वर कुमार म्हणाला, “जर अंतिम सामन्यात आपण आमने-सामने असू तर अंतिम षटकापर्यंत मी तुला खेळूच देणार नाही. मी तुला सुरूवातीच्याच षटकांत बाद करीन. पण अगदी तू म्हणतो तसं झालंच, तर मी २-३ पर्याय तयार ठेवेन.” त्यानंतर भुवनेश्वर कुमारने ते पर्यायदेखील सांगितले.
विराट की तेंडुलकर? युवराज की धोनी?… लाईव्ह चॅटवर रंगला ‘रॅपिड फायर’चा खेळ
ऐका मजेशीर संभाषण –
SavageBhuvi.mp4#WarnersCorner #OrangeArmy #SRH pic.twitter.com/8fbhAt9jOW
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 24, 2020
“आयुष्यात एकदाच कॉफी प्यायलो, ‘स्टारबक्स’पेक्षाही महाग पडली”
दरम्यान, २७ फेब्रुवारीला सनरायझर्स हैदराबाद संघाकडून ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. सनरायझर्स संघाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली होती. त्याचसोबत त्यांनी वॉर्नरचा एक खास संदेशही ट्विट केला होता. “हैदराबाद संघाच्या सगळ्या चाहत्यांना माझा नमस्कार. माझी हैदराबाद संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. मला मिळालेल्या या संधीसाठी मी संघ व्यवस्थापनाचा आभारी आहे. केन विल्यमसन आणि भुवनेश्वर कुमार यांनी संघाचे चांगले नेतृत्व केले. IPL जिंकण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू”, असा संदेश त्याने व्हिडीओद्वारे दिला होता.