IND vs AUS Gabba Test Big Blow to Australia: गाबा कसोटीत ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद होत ४४५ धावांचा मोठा डोंगर उभारला. पण प्रत्युत्तरात भारतीय संघाची टॉप फलंदाजी ऑर्डर ५० धावांच्या आत कोसळली. पावसामुळे व्यत्यय येत असलेल्या या सामन्यात आता ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉर्डर-गावकर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीसाठी जोश हेजलवुडला दुखापतीनंतर लगेच प्लेईंग इलेव्हनमध्ये परत आणण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाला महागात पडला आहे. भारताविरुद्धच्या गाबा कसोटीच्या चौथ्या दिवशी हेझलवुडला दुखापत झाली असून हा अनुभवी वेगवान गोलंदाज अवघ्या एक षटकानंतर मैदानाबाहेर गेला आहे. आता त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात नेले असल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली आहे.

हेही वाचा – WTC Final Scenario: गाबा कसोटी गमावल्यानंतर भारत WTC 2025 फायनलच्या शर्यतीतून होणार बाहेर?

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील पहिल्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या जोश हेझलवूडला तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ड्रिंक्स ब्रेकनंतर मैदान सोडावे लागले. ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रवक्त्याने सांगितले की तो पोटरीच्या दुखापतीने त्रस्त आहे. वैद्यकीय तपासणीनंतरच दुखापतीची तीव्रता कळेल. त्यामुळे या डावात पुन्हा गोलंदाजी करण्याची शक्यता कितपत असेल याबाबत शंका आहे.

हेही वाचा – VIDEO: गुकेशने विश्वविजेतेपदानंतर कोचला दिलेलं वचन केलं पूर्ण, भीतीवर विजय मिळवत केलं थरारक बंजी जंपिंग

हेझलवूडने चौथ्या दिवसाचा खेळा सुरू होण्यापूर्वी वैद्यकीय कर्मचारी आणि प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांच्याशी चर्चा केली होती, परंतु मंगळवारी सकाळी (१७ डिसेंबर) तो गोलंदाजीसाठी आला तेव्हा त्याला वेदना होत असल्याचे दिसून आले. त्याचा पहिला चेंडू खूप लहान, वाईड आणि फक्त १२८ किमी प्रतितास इतका होता. हेझलवूडने आपले षटक पूर्ण केले आणि ड्रिंक्स ब्रेकमध्ये कर्णधार, उपकर्णधार स्मिथ आणि फिजिओथेरेपिस्टशी चर्चा केली.

हेही वाचा – NZ vs ENG: केन विल्यमसनने शतकासह घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच फलंदाज

हॅझलवूडला दुखापतीमुळे ॲडलेड कसोटीतून बाहेर जावे लागले होते, परंतु ऑस्ट्रेलियाने तो ब्रिस्बेनमध्ये खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे सांगितले. तिसऱ्या दिवशी त्याने पाच षटकं टाकली तेव्हा त्याला काही त्रास जाणवला नाही, ज्यामध्ये त्याने विराट कोहलीची बहुमोल विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus big blow to australia as josh hazlewood suffers calf injury went hospital for scans gabba test bdg