India vs Australia 1st Test Series Live Streaming: बहुप्रतिक्षित अशी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धा उद्या म्हणजेच २२ नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. भारत वि ऑस्ट्रेलियामधील ही कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच खूप चर्चेत आहे. २२ नोव्हेंबरपासून पर्थच्या मैदानावर कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. हा सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे. ५ सामन्यांच्या या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ कसून तयारी करत आहेत. गेल्या दोन बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत करणाऱ्या टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेतील सर्व सामने लाईव्ह कुठे पाहता येतील जाणून घेऊया.

हेही वाचा – Border Gavaskar Trophy 2024 Schedule: भारतीय वेळेनुसार बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं कसं असणार वेळापत्रक? पहाटे किती वाजता सुरू होणार सामना?

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी बारतीय संघाला ऑस्ट्रेलियाचा किमान ४-० असा पराभव करावा लागेल. यावेळी भारताला घरच्या मैदानावर कडवे आव्हान देण्यासाठी ऑस्ट्रेलिया पूर्णपणे सज्ज असेल. रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या बाळाच्या जन्मामुळे पर्थ कसोटीला मुकणार आहे. तर त्याच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार आहे. रोहित शर्माच्या जागी सलामीला कोण उतरणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.

हेही वाचा – Border Gavaskar Trophy Best Innings: सचिन, द्रविड, पंत अन् बुमराहचा स्लोअर बॉल…, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासातील संस्मरणीय क्षण

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने कधी, कुठे लाईव्ह पाहता येणार?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे. याशिवाय चाहत्यांना डिस्ने प्लस हॉटस्टार ॲपद्वारे या मालिकेच्या लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. या मालिकेतीस सर्व सामन्यांच्या वेगळ्या आहेत. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांची वेळा वेगळ्या आहेत. त्याच वेळी, शेवटच्या दोन कसोटी सामन्यांची वेळ समान आहे.

हेही वाचा – IND vs AUS: वॉर्नरचा वारसा चालवणारा ऑस्ट्रेलियाचा नवा सलामीवीर कोण?

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२५ चे वेळापत्रक

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी:
    २२-२६ नोव्हेंबर, पर्थ क्रिकेट स्टेडियम, पर्थ (सकाळी ७.५० वाजता)
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी:
    ६-१० डिसेंबर, ॲडलेड ओव्हल, ॲडलेड (सकाळी ९:३० वाजता)
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी:
    १४ – १८ डिसेंबर, गाबा स्टेडियम, ब्रिस्बेन (सकाळी ५.५० वाजता)
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी:
    २६-३० डिसेंबर, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न (सकाळी ५.०० वाजता)
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवी कसोटी:
    ३-७ जानेवारी (२०२५), सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी (सकाळी ५.०० वाजता)
  • प्राईम मिनिस्टर इलेव्हन वि भारत अ – २ दिवसीय सराव सामना:
    ३० नोव्हेंबर-०१ डिसेंबर, मनुका ओव्हल, कॅनबेरा (सकाळी ९.१० वाजता)

हेही वाचा – Virat Kohli Viral Post: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी विराट कोहलीच्या पोस्टने उडवली खळबळ; पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराझ खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

राखीव खेळाडू – मुकेश कुमार, नवदीप सैनी, यश दयाल

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.

Story img Loader