IND vs AUS 4th Test Updates in Marathi : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा रोहित शर्मा नाणेफेकीच्या वेळी आला तेव्हा असे मानले जात होते की, टीम इंडिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल करणार नाही. विशेषतः टॉप ऑर्डरमध्ये कोणताही बदल करणार नाही, पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मोठा निर्णय घेत एका फ्लॉप खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले.
या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता –
जेव्हा रोहित शर्माला बॉक्सिंग डे टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने खुलासा केला की प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनमधून शुबमन गिलला बाहेरचा स्ता दाखवला आहे. या सामन्यात शुबमन गिलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया तीन अष्टपैलू खेळाडूंसह या सामन्यात उतरली आहे. वॉशिंग्टन सुंदरच्या उपस्थितीमुळे भारतीय संघाला जो समतोल मिळत होता, तो शुबमन गिल टीम इंडियाला देऊ शकला नाही. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश करण्यामागे हे एक कारण असल्याचे दिसते.
बॉक्सिंग डे टेस्टसाठी भारत-ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन –
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, स्कॉट बोलँड.
u
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप