IND vs AUS Rohit Sharma angry on Yashasvi Jaiswal Video Viral : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत आहे. ऑस्ट्रेलियान पहिल्या दिवशी भारतावर वर्चस्व गाजवताना ६ बाद ३११ धावा केल्या. या दरम्यान क्षेत्ररक्षण करताना कर्णधार रोहित शर्मा सहकारी खेळाडू यशस्वी जैस्वालवर चिडताना दिसला. यावेळी रोहित जैस्वालला खडसावतानाचा आवाज आवाजही स्टंप माईकमध्ये कैद झाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वास्तविक, जेव्हा स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबूशेन फलंदाजी करत होते, तेव्हा रोहितने जैस्वालला फलंदाजाच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षण करण्यासाठी उभे केले होते. यावेळी जैस्वाल हा चेंडू त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच हवेत उडी मारताना दिसल्याने रोहित शर्मा संतापला. रोहित जैस्वालला म्हणाला, “अरे जस्सू, तू गल्ली क्रिकेट खेळतोयस का? जोपर्यंत फलंदाज खेळत नाही तोपर्यंत उठायचे नाही.” रोहितचा हा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला.”
रोहित जैस्वालला खडसावतानाचा आवाज आवाज स्टंप माईकमध्ये कैद –
खरं तर, अनेक वेळा फलंदाजाच्या जवळचा क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करताना गुडघ्यावर हात ठेवून वाकलेला किंवा कधी खाली बसलेला दिसतो. त्यामुळे झेलची संधी जास्त असते. त्यामुळे रोहितने फिरकी गोलंदाज गोलंगदाजी करत असताना जैस्वालला फलंदाजाच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षणासाठी उभे केले होते.
हेही वाचा – IND vs AUS : सॅम कॉन्स्टासने जसप्रीत बुमराहविरुद्ध षटकार लगावत लावली विक्रमांची रांग! पाहा संपूर्ण यादी
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे भारतावर वर्चस्व –
u
मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात सहा गडी गमावून ३११ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ ६८ धावांवर नाबाद असून कर्णधार पॅट कमिन्स आठ धावांवर नाबाद आहे. १९ वर्षीय नवोदित सॅम कॉन्स्टासने उस्मान ख्वाजासोबत पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी केल्याने कांगारूंची चांगली सुरुवात झाली. सॅम कॉन्स्टासने पदार्पणाच्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करत बुमराहला लक्ष्य केले. त्याने अर्धशतक झळकावले. मात्र, यानंतर तो रवींद्र जडेजाच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. तो ६५ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ६० धावा करून बाद झाला.
हेही वाचा – IND vs AUS : “त्याने टक्कर होण्यास…”, विराट-कॉन्स्टासच्या धक्काबुकीवर प्रकरणावर रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य
यानंतर ख्वाजाने स्टीव्ह स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. ख्वाजाने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २७ वे अर्धशतक झळकावले. १२१ चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने ५७ धावा करून तो बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याच वेळी, हेड खाते उघडू शकला नाही. त्याला बुमराहने क्लीन बोल्ड केले. त्यानंतर बुमराहने मिचेल मार्शला स्वस्तात बाद केले. त्याला चार धावा करता आल्या. लबूशेनने १४५ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ७२ धावांची खेळी केली. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे २२ वे अर्धशतक होते. त्याचबरोबर स्मिथने आतापर्यंत शानदार फलंदाजी केली आहे. त्याने १११ चेंडूत ६८ धावांच्या नाबाद खेळीत पाच चौकार आणि एक षटकार ठोकला. भारताकडून बुमराहने तीन विकेट्स घेतल्या. तर आकाश दीप, जडेजा आणि सुंदर यांना प्रत्येकी एक विकेट घेतली.