सिडनी कसोटी सामन्यात भारताच्या चेतेश्वर पुजाराचं द्विशतक अवघ्या ७ धावांनी हुकलं. दोन दिवस मैदानावर ठाण मांडून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेणारा पुजारा १९३ धावसंख्येवर लॉयनच्या गोलंदाजांवर झेलबाद होऊन माघारी परतला. पुजाराने सर्वात आधी मयांक अग्रवाल, त्यानंतर हनुमा विहारी आणि ऋषभ पंत यांच्या जोडीने भागीदारी रचत भारताच्या डावाला आकार दिला. द्विशतकी खेळी करण्यात पुजाराला अपयश आलं असलं तरीही त्याच्या नावावर आतापर्यंत ६ विक्रमांची नोंद झालेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१) ऑस्ट्रेलियात ४ किंवा त्यापेक्षा कमी कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्वाधीच चेंडू खेळण्याचा विक्रम चेतेश्वर पुजाराच्या नावावर जमा झाला आहे. त्याने आतापर्यंत तब्बल १२४५ चेंडू खेळले आहेत.

२) आतापर्यंत कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजाराने तब्बल १८६८ मिनीटं खेळपट्टीवर ठाण मांडून खेळ केला आहे. याआधी सुनिल गावसकर यांनी १९७१ साली विंडीजविरुद्ध आणि १९८१-८२ साली इंग्लंडविरुद्ध पुजारापेक्षा जास्त मिनीटं खेळ केला होता.

३) परदेशी खेळपट्टीवर सर्वाधिक चेंडू खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पुजारा तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. ( ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेचा निकष )

  • राहुल द्रविड विरुद्ध इंग्लंड – २००२ – १३३६ चेंडू
  • अॅलिस्टर कुक विरुद्ध भारत – २०१२-१३ – १२८५ चेंडू
  • चेतेश्वर पुजारा विरुद्ध ऑस्ट्रेलिया – २०१८-१९ – १२४५* चेंडू

४) ऑस्ट्रेलियात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पुजाराला सहावं स्थान

  • सचिन तेंडुलकर – नाबाद २४१ – २००४ सिडनी
  • राहुल द्रविड – २३३ – २००३ अॅडलेड
  • रवी शास्त्री – २०६ – १९९२ सिडनी
  • अझर अली – नाबाद २०५ – २०१६ मेलबर्न
  • विरेंद्र सेहवाग – १९५ – २००३ मेलबर्न
  • चेतेश्वर पुजारा – १९३ – सिडनी

५) कसोटी सामन्यात १९०-२०० मध्ये बाद होणारा पुजारा आठवा फलंदाज ठरला आहे.

कुंदेरन (१९२), मोहम्मद अझरुद्दीन (१९९, १९२), राहुल द्रविड (१९०, १९१), सचिन तेंडुलकर (१९३, नाबाद १९४), विरेंद्र सेहवाग (१९५), लोकेश राहुल (१९९), शिखर धवन (१९०), चेतेश्वर पुजारा (१९३)

६) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग दोन डावांमध्ये ५०० पेक्षा जास्त मिनीटं फलंदाजी करणारा पुजारा चौथा फलंदाज ठरला आहे.