IND vs AUS 1st Test Match Updates in Marathi: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरूवात झाली असून पर्थ पहिल्या सामन्यातही विराटची बॅट शांत होती. ऑस्ट्रेलियात विराट कोहली आपल्या पूर्वीच्या फॉर्ममध्ये परतेल असे वाटले होते. पण पहिल्याच सामन्यात विराट ५ धावा करत बाद झाला. ऑस्ट्रेलिया, जिथे विराट कोहलीने कायमच खोऱ्याने धावा केल्या आहेत. पण आता विराट खराब फॉर्ममधून जात आहे. पुन्हा एकदा कोहलीच्या फॉर्मवर आणि त्याच्या कारकिर्दीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अवघ्या १२ धावांवर २ विकेट गमावल्यानंतर आशा स्टार फलंदाज विराट कोहलीवर होत्या आणि तो लयीतही दिसला पण काही वेळात विराटही क्रीज सोडून पॅव्हेलियनमध्ये परतला. पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर विराट कोहली अशाच एका चेंडूवर जोश हेझलवूडला झेलबाद केलं आणि तो पहिल्या स्लिपमध्ये झेलबाद झाला. अशाप्रकारे हेजलवुड कोहलीला १०व्यांदा बाद केले. तिन्ही फॉरमॅटमध्ये एकत्रितपणे कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करणारा तो ऑस्ट्रेलियन गोलंदाज बनला. १२ चेंडूंचा सामना केल्यानंतर कोहली केवळ ५ धावा करून बाद झाला.

IND vs AUS 1st Test Virat Kohli criticized by fans after dismissal in Perth test 1st inning
Virat Kohli : ‘आता गंभीर निर्णय घेण्याची योग्य वेळ…’, विराटच्या फ्लॉप शोने वैतागलेल्या चाहत्यांची संतप्त प्रतिक्रिया
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Prakash Ambedkar on government formation
Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!
eknath shinde devendra fadnavis (1)
महायुतीची सत्ता आल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? शिवसेना नेत्यांची मोर्चेबांधणी; भाजपाचाही पाठिंबा?
Kenya airport deal cancelled
Kenya cancels Adani Deal: अदाणींना दुसरा झटका; केनियाने विमानतळ, ऊर्जा प्रकल्प केले रद्द, खासदारांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत
KL Rahul Controversial Dismissal Despite No Conclusive Evidence by Third Umpire IND vs AUS 1st Test
KL Rahul Wicket Controversy: केएल राहुल आऊट की नॉट आऊट? तिसऱ्या पंचांनी घाईत दिला निर्णय अन् राहुलच्या विकेटमुळे सुरू झाला नवा वाद
viral video of andhra pradesh
Viral Video : नवजोडप्याला लग्नाचा आहेर देताना मित्राचा करुण अंत; व्हायरल VIDEO मुळे खळबळ!
Sanjay Raut
Sanjay Raut on CM : “मुख्यमंत्री पदाचा निर्णय महाराष्ट्रातच घेणार”, संजय राऊत थेट इशारा; म्हणाले, “दिल्लीतून…”

हेही वाचा – KL Rahul Wicket Controversy: केएल राहुल आऊट की नॉट आऊट? तिसऱ्या पंचांनी घाईत दिला निर्णय अन् राहुलच्या विकेटमुळे सुरू झाला नवा वाद

साहजिकच कोहली ज्यारितीने बाद झाला त्यावर बरीच चर्चा होणार होती. विराट ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू खेळायला गेला. या चुकीमुळे सहसा वारंवार आऊट होणाऱ्या विराटने तीच चूक पुन्हा केली आणि स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने याबद्दल खुलेपणाने स्पष्टीकरण दिले. या डावात विराट क्रीझच्या बाहेर खूप दूर उभा राहून फलंदाजी करत होता जेणेकरून तो कोणत्याही प्रकारचा स्विंग रोखू शकेल आणि ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करताना विकेट गमावू नये.

पुजारानेही हेच सांगिले आणि स्पष्ट केले की कोहलीला कव्हर ड्राईव्ह खेळणं पसंत करतो आणि क्रीजवर राहून हे फटके खेळणं त्याच्यासाठी कठीण होतं, त्यामुळे त्याने क्रीझच्या बाहेर उभं राहून खेळण्याचा निर्णय घेतला. पण ही चूक कोहलीची होती असेही त्याने सांगितले.

हेही वाचा – IND vs AUS: अनुभवी अश्विन आणि जडेजाऐवजी पर्थ कसोटीत वॉशिंग्टन सुंदरची निवड का करण्यात आली? काय आहे कारण?

पुजाराने समजावून सांगितले की, ऑस्ट्रेलियात, विशेषत: पर्थमध्ये बाऊन्सचीही काळजी घ्यावी लागते आणि त्यामुळे बाऊन्सपासून स्वतःला वाचवण्यासाठी क्रीजवर राहणेही अधिक महत्त्वाचे आहे. पुजारा म्हणाला की कोहली फ्रंटफुटवर होता, तर क्रीजच्या आत आणि बॅकफूटवर असल्यामुळे अशा अचानक उसळणाऱ्या चेंडूंचा सामना करणं थोडं सोप असतं. तो म्हणाला की इथे पहिला तास किंवा पहिले सत्र कमी धावा करून घालवता आले असते, त्यानंतर धावा करता आल्या असत्या.

हेही वाचा – Virendra Sehwag Son: जैसा बाप वैसा बेटा! सेहवागच्या लेकाचे वादळी द्विशतक, आर्यवीरने ३४ चौकार २ षटकारांसह केली तुफानी फटकेबाजी

पहिल्या कसोटी सामन्याचे अपडेट्स

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ सुरू झाली आहे. पहिला कसोटी सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जात आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचा कर्णधार असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि नितीश रेड्डी यांना पदार्पणाची कॅप्स देण्यात आली.

हेही वाचा – IND vs AUS: भारताकडून नितीश रेड्डी-हर्षित राणाचे कसोटीत पदार्पण, जसप्रीत बुमराहने प्लेईंग इलेव्हन जाहीर करत दिला धक्का

भारतीय डावाची सुरुवात केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी केली. जैस्वाल ऑस्ट्रेलियातील पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला. युवा सलामीवीराला आपले खातेही उघडता आले नाही. मिचेल स्टार्कने त्याला झेलबाद केले. यानंतर देवदत्त पड्डिकलही खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. २ युवा फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर केएल राहुलला साथ देण्यासाठी विराट कोहली क्रीजवर आला. पण त्याने निराश केली. यानंतर आतापर्यंत भारतीय संघ दुसऱ्या सेशनमध्ये ६ बाद १२१ धावा केल्या आहेत. ऋषभ पंत आणि नितीश रेड्डीची जोडी मैदानात आहे.